आज 'जागतिक कापूस दिवस' साजरा केला जातो. ७ ऑक्टोबर रोजी हा दिवस पर्यावरण रक्षणासाठी महत्वाच्या कापसाचा दिवस म्हणून साजरा करतात. कापसापासून सुती कपडे तसेच मऊ आणि आरामदायक वस्तू तयार केल्या जातात. सगळ्यांनाच मऊ आणि सुती कपडे घालायला आवडतात. सध्याच्या फॅशनच्या जमान्यातही कॉटनचे कपडे प्रत्येकाच्या वापरायला आवडतात.
ज्यांना कम्फर्टेबल कपडे पाहिजे असतात ते लोक सुती कॉटनचे कपडे वापरतात. लहान मुलांसाठी नेहमीच सुती मऊ कपडे वापरले जातात. सुती कपड्याने शरीराला थंडावा मिळतो. बरेच लोक उन्हाळ्यात सुती कपड्यांचा वापर करतात. कापूस आपल्या जीवनात किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
सुती कपड्यांचे फायदे
सुती कपडे उन्हाळ्यात प्रत्येकजण परिधान करतो. या सुती कपड्यांमुळे शरीराला आराम मिळतो. तसेच शरीराला कोणत्याही प्रकारची समस्या जाणवत नाही. जर तुम्हाला कॉटनचे कपडे वापरायला आवडत असतील तर तुम्हाला आराम तर मिळतोच पण ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागत नाहीत. कॉटनचे कपडे दीर्घकाळ टिकतात. अशा परिस्थितीत सुती कपडे खरेदी करणे फायदेशीर ठरते.
तुम्हाला सुती कपडे घालायला आवडत असतील तर ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगले आहे. त्याने तुम्हाला ऊर्जा, पाणी आणि इतर संसाधनांची बचत करण्यात मदत होते. कापूस हा पर्माकल्चर शेतीद्वारे पिकवला जातो तो फायदेशीर मानला जातो.तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी सुती कपडे परिधान करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.