World Aids Vaccine Day Saam Tv
लाईफस्टाईल

World Aids Vaccine Day: दरवर्षी साजरा केला जातो एड्स लस दिन, परंतु अजूनही लस का बनलेली नाही?

जागतिक एड्स लस दिन दरवर्षी साजरा केला जातो, परंतु आजपर्यंत त्याची लस बनलेली नाही, जाणून घेऊयात काय आहे कारण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दरवर्षी 18 मे हा जागतिक एड्स लस दिन (World Aids Vaccine Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस एड्स प्रतिबंध आणि एचआयव्ही लसीच्या गरजेबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक एड्स लस दिनाची संकल्पना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी 1997 मध्ये मांडली होती.

त्यांनी मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटीतील भाषणादरम्यान सांगितले होते की 'केवळ एक प्रभावी, प्रतिबंधात्मक एचआयव्ही लस एड्सचा धोका कमी करू शकते आणि ते संपवू शकते'. त्यांच्या भाषणाच्या वर्धापन दिनानिमित्त, 18 मे 1998 रोजी प्रथमच जागतिक एड्स लस दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून जरी हा दिवस करण्यात येत असला तरीही आजही त्याचा प्रभावी असा उपचार सापडलेला नाही. आजही एड्स हा एक आजार आहे. त्यामुळे जाणून घेऊयात इतक्या वर्षांनंतरही त्याची लस का बनली नाही आणि याबद्दलच्या अनेक महत्वाच्या गोष्टी.

का अजूनही बनलेली नाही एड्सची लस? (Why isn't the AIDS vaccine made yet?)

एड्स सारख्या भयानक आजाराला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून शोध आणि वेगवेगळे प्रयोग करणे सुरु आहे. परंतु आजतागायत अशी कोणतीच लस तयार झालेली नाही जी या आजाराला संपवू शकेल आणि याच्या विषाणूला संपवू शकेल. हा विषाणू जेव्हा कोणत्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. सोबतच शरीरातील अनेक भागात हानिकारक असे परिणाम करतो. यामुळे व्यक्तीच्या शरीरातील रोगाशी लढण्याची क्षमता संपुष्टात येऊ लागते आणि हळूहळू बाधित व्यक्ती मृत्यूच्या अवस्थेत पोहोचतो. हे सर्व पाहता आणि विषाणूचे आक्रमक स्वरूप लक्षात घेता, त्याला रोखण्यासाठी प्रभावी लस तयार करणे खूप कठीण आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.

औषधांच्या मदतीने HIV नियंत्रणात येऊ शकतो;

अर्थात, एचआयव्हीला (HIV) नियंत्रित केला जाऊ शकतो. एड्स रुग्णांना (AIDS Patient) योग्य वैद्यकीय सेवा दिल्यास त्यांचे आयुष्य वाढून ते दीर्घाकाळ जगू शकतात. परंतु ही औषधे संक्रमित व्यक्तीपासून झालेला एड्सचा प्रसार रोखू शकत नाहीत.

एड्स किती धोकादायक आहे?

ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) हा एक व्हायरस आहे जो एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर थेट हल्ला करतो. एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीच्या शरीरात पांढऱ्या रक्त पेशी (White Blood Cells) कमी होऊ लागतात आणि यामुळे शरीर कोणत्याही आजाराशी लढू शकत नाही. शेवटी हा आजार संपूर्ण शरीरात पसरतो आणि ही स्थिती त्या व्यक्तीला मृत्यूच्या उंबरठ्यावर आणते.

एड्सची लक्षणे काय आहेत? (What are the symptoms of AIDS?)

तोंडात पांढरे ठिपके पडणे, खूप थकवा येणे, अचानक वजन कमी होणे, खूप ताप, अति घाम येणे, वारंवार जुलाब, सतत खोकला, घसा, मांड्या आणि बगलेतील लसिका ग्रंथींना सूज येणे, गुठळ्या, शरीरात खाज सुटणे आणि भाजणे यासारख्या समस्या, न्यूमोनिया, क्षयरोग, त्वचेचा कर्करोग इत्यादींचा समावेश एड्सच्या लक्षणांमध्ये होतो. या वेळी अशी काहीही लक्षणे जाणवली तर एखाद्या व्यक्तीने तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्वरित तपासणी केली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT