World Aids Day 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

World Aids Day 2022 : निरोगी बाळ जन्माला यावे यासाठी HIV चे होणार लवकर निदान !

१ डिसेंबर हा दिवस आज जगभरात HIV बाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

World Aids Day 2022 : जागतिक संघटनेच्या अहवालानुसार भारतात सुमारे २० लाख, ३५ हजार लोक हे HIV (PLHIV) सारख्या आजारासोबत जगत आहेत. त्यातील केवळ १० लाख ७८ हजार लोकांनाच फक्त आपल्या आजाराची कल्पना असल्याचे सांगितले गेले आहे.

१ डिसेंबर हा दिवस आज जगभरात HIV बाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. देशभरात HIV चाचण्यांच्या बाबतीत झालेल्या प्रगतीलाही कोरोनाच्या काळात आरोग्यदायी सुविधा मिळविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याबाबतीत बाबतीत झालेली गैरसोय शोधण्याचे काम व या संसर्गाला (Disease) अधिक प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे.

या संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी व २०३० पर्यंत येणाऱ्या पिढीला HIV संसर्गापासून थांबविण्यासाठी सर्व HIV रुग्णांपैकी ९५ टक्‍के रुग्णांच्या आजाराचे निदान करण्याचे UNAIDS चे आखून दिले. त्याचे पहिले उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनेही हे अत्यावश्यक आहे.

HIV पॉझिटिव्ह रुग्णांचे लवकर आणि अचूक निदान होणे हे आवश्यक आहे. शक्य तितक्या लवकर कळण्यासाठी रुग्णाला होणारा त्रास हा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. इतकेच नव्हे, तर यामुळे भविष्यातील HIV संक्रमणांनाही प्रतिबंध होतो. कारण आपल्या संसर्गाविषयी अनभिज्ञ असलेल्या व्यक्तींकडून हा विषाणू इतरांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता ३.५ पट अधिक असते. शिवाय निदान लवकर झाल्याने रुग्णांमधील अपंगत्व आणि प्राणहानीचा धोकाही कमी होतो.

युनिसन मेडिकेअर अँड रिसर्च सेंटर, मुंबईच्या HIV इन इन्फेक्शियस डिजिजेस विभागाचे सल्लागार आणि AIDs सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. इश्वर गिलाडा म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्रात असलेले HIV रुग्ण हे अधिक आहेत. HIV सह जगणार्‍या ७५ टक्‍के लोकांना याची माहिती आहे पण उरलेल्या २५ टक्के लोकांना यांच्या बाबत अद्यापह माहित नाही.

रॅपिड पॉइंट-ऑफ-केअर चाचण्यांसारख्या गोष्टींचा वापर केल्यास HIV सारख्या रोगावर मात करता येऊ शकते. वेळेवर केलेल्या चाचण्या आणि संसर्गाचे, विशेषत: जिथे उच्च व्हायरल लोडमुळे संक्रमणाचा धोका अधिक असतो अशा व्यक्तींमध्ये असलेल्या तीव्र स्वरूपाच्या संसर्गाचे निदान होणे महत्त्वाचे आहे. यामुळे वेळच्यावेळी उपचार मिळण्यास मदत होते, ज्यातून रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळू शकतात, व त्याचवेळी संसर्ग पसरण्यासही अटकाव होऊ शकतो.

चिकित्सात्मक मांडणीमध्ये व्यावसायिक तज्ज्ञांद्वारे HIV चे वेगवान स्क्रीनिंग करणाऱ्या पॉइंट-ऑफ-केअर चाचण्यांसारख्या नवसंकल्पना या संसर्गाच्या वेळेवर निदानाची हमी मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. यामुळे लोकांना अधिक सुलभतेने निदानसुविधा उपलब्ध होतात व केवळ २० मिनिटांत अचूक निष्कर्ष प्राप्त होत असल्याने आपल्या संसर्गाची स्थिती सहज जाणून घेण्यासाठी ते सक्षम बनतात. भारतासारख्या देशातील दुर्गम व ग्रामीण भागांमध्ये निदान सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत व स्वत:हून चाचण्या करून घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, अशा ठिकाणी वेगवान पॉइंट-ऑफ-केअर उपाययोजना विशेष महत्त्वाच्या आहे.

आज होणाऱ्या फोर्थ जनरेशन तंत्रज्ञानावर आधारित वेगवान चाचण्यांच्या उपलब्धतेमुळे पॉइंट-ऑफ-केअर चाचण्यांचा दर्जा सातत्याने उत्क्रांत होत आहे, ज्यामुळे सेकंड आणि थर्ड जनरेशन चाचण्या मागे पडत आहेत.

HIV

1. HIV चाचणी

  • या नव्या चाचण्याचा वापर अधिक चांगला व्हावा यासाठी थर्ड जनरेशन रॅपिड चाचण्यांमधून सुटून जाणार्‍या संसर्गांपैकी २८ टक्‍के संसर्ग शोधण्यात या चाचण्या यशस्वी ठरत आहेत.

  • यामुळे एका मोठ्या लोकसंख्या गटाला आपल्या संसर्गाच्या स्थितीची माहिती मिळेल याची खबरदारी घेतली जाते, जेणेकरून अशा व्यक्तींना आपल्या स्थितीच्या व्यवस्थापनासाठी दर्जेदार आरोग्यसेवा सुरळीतपणे उपलब्ध व्हाव्यात व चाचणीमुळे रोगाचे लवकर निदान होण्यास मदत मिळते.

  • संसर्गानंतर अगदी १५-२५ दिवसांत दिसू लागणार्‍या HIV अँटिबॉडीज आणि अँटीजेन ओळखण्याची क्षमता त्यांत असते.

  • त्यामुळे, या चाचण्या अल्प कालावधीमध्ये अधिक अचूक निदान देतात.

  • हे रक्तपेढ्यांसाठीच्या स्क्रिनिंगच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे, जिथे HIV निदानासाठीचा कालावधी जवळ-जवळ निम्म्यावर येतो.

2. पॉइंट - ऑफ- केअर

  • अबॉटच्या भारतातील रॅपिड डायग्नोस्टिक बिझनेस विभागाचे जनरल मॅनेजर सुनील मेहरा सांगतात, लोकांना पॉइंट ऑफ केअर HIV च्या निदानासाठीच्या उपाययोजना अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देण्याप्रती अबॉट कटिबद्ध आहे.

  • पॉइंट-ऑफ-केअर चाचण्यांच्या चौथ्या पिढीमध्ये चाचण्यांचे नवे मापदंड प्रतिबिंबित झाले आहे, जे HIV-पॉझिटिव्ह प्रकरणांचे, अगदी व्हायरलच्या तुलनेने कमी असलेल्या प्रकरणांचेही लवकर निदान होण्यास सहाय्य करतात, ज्यातून रुग्णांच्या देखभालीच्या नव्या शक्यतांसाठीचा नवा मार्ग मिळतो.

  • भारतातही पॉइंट ऑफ केअर हे खासगी आणि सरकारी हॉस्पिटल्स व निदानकेंद्रांना नेक्स्ट जनरेशन संसाधनांची मदत पुरवित आहोत, जेणेकरून देशावरील HIV ताणाचा प्रश्न सुटण्यास मदत व्हावी.

3. तीव्र चाचणी

  • या चाचणीमध्ये माणसाच्या शरीरात हा कमी असला तरी याच्या विषाणूची संख्या ही अधिक पट जास्त असते.

  • सर्व HIV संसर्गांमध्ये अशा संसर्गांचे प्रमाण ५ ते २० टक्के असते. यामुळे HIV संसर्ग झाल्याचे निदान होण्यासाठीचा विंडो पीरियड असा संसर्ग झाल्यापासून जेमतेम १२ दिवसांचाच राहतो.

  • थर्ड जनरेशन चाचण्यांच्या बाबतीत याच निदानासाठी २० दिवस किंवा त्याहून अधिक दिवस हमखास लागतात.

  • त्यामुळे HIV-पॉझिटिव्ह रुग्णांची चटकन ओळख पटते व त्यांना उपचारप्रक्रियेशी जोडता येते.

  • यातून संक्रमणाची साखळीही तोडता येते, जे विशेषकरून महत्त्वाचे आहे, कारण तीव्र संसर्गाचा संबंध उच्च व्हायरल आणि संक्रमणाच्या धोक्याशी असतो.

4. नवीन शोध

  • चाचण्यांमधील नवीन शोध ही HIV राष्ट्रीय स्तरावर होणारे निदान कमी करण्यासाठी व या आजाराबाबत लोकांमध्ये लवकर जनजागृती व्हावी हा उद्देश आहे.

  • तसेच निदान झालेल्या प्रत्येक व्यक्तीला लवकर उपचार व्हावे व प्रयत्नांना यश मिळावे ही महत्त्वाची बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT