सध्या जीवनशैली पूर्णपणे बदलली असून कामाचे तास आणि ताणतणाव यांच्यामध्ये वाढ झाली आहे. मात्र तुम्हाला माहितीये का या गोष्टीच्या तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होतोय. यामुळे नात्यातील जवळीकता झाली आहे. परिणामी मानसिकदृष्ट्या ताण येतो आणि पालकत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यात आणि गर्भधारणा करण्यात समस्या येत असल्याचं समोर आलं आहे. अशा जोडप्यांना एआरटी प्रक्रियेची( कृत्रिम गर्भधारणा) मदत घेतल्याने गर्भधारणेस मदत होऊ शकते.
आजकाल कामाच्या वेळा काही ठरलेल्या नाहीत. कामाचे वाढते तास नैसर्गिक चक्रात व्यत्यय आणतात. यामुळे पुरुष आणि महिला दोघांनाही शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या थकवा जाणवतो. याचाच अर्थ या सर्व गोष्टींचा जोडप्याच्या नात्यावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. जेव्हा शारीरिक आणि भावनिक आरोग्य बिघडते तेव्हा गैरसमज, ताण आणि अगदी नातेसंबंधातही असंतोष निर्माण होऊ शकतो. या सर्वांचा एकुणच गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होतो.
पुण्यातील मदरहूड हॉस्पिटल्सच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी सांगितलं की, तणावामुळे निर्माण होणारे कॉर्टिसोलसारखे हार्मोन हे कामवासनेवर परिणाम करतात. यामुळे जोडीदारांना जवळीक साधणं कठीण होतं. २७ ते ३५ वयोगटातील १० पैकी ६ जोडप्यांना तणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे जवळीकता कमी होण्याची तक्रार आहे. त्याचप्रमाणे कामवासना कमी होण्याची समस्याही आहे. त्यांना इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या एआरटी पध्दतीचा सल्ला दिला जातो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी आठवड्यातून ४ ते ५ जोडप्यांना या समस्या येत असल्याचं मी पाहिलंय.
पुण्यातील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. निशा पानसरे म्हणाल्या की, जर एखादं जोडपं सतत ताणतणावात राहिलं तर त्यांच्यामध्ये कॉर्टिसॉलची पातळी वाढते. हे हार्मोन प्रजनन क्षमत व्यत्यय आणते, ज्यामुळे महिलांमध्ये ओव्हुलेशन आणि पुरुषांमध्ये स्पर्म्सच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. झोपेमुळे प्रजननक्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गर्भधारणेदरम्यान जोडप्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. १० पैकी ७ जोडप्यांना काम आणि जीवन यांच्यातील संतुलन राखण्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं.
डॉ. पद्मा पुढे यांच्या सांगण्यानुसार, तणावाचं मॅनेजमेंट करणं त्याचप्रमाणे भावनिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं रहावं यावर तरूणांनी भर दिला पाहिजे. याशिवाय काम आणि घर या दोन्हींमध्ये समतोल राखावा.
डॉ. निशा पानसरे पुढे सांगतात की, गर्भधारणेच्या शक्यता सुधारण्यासाठी,जोडप्यांनी संतुलित जीवनशैली राखणं महत्त्वाचं आहे. यामध्ये पुरेशी झोप, पोषक आहार आणि कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होणं हे प्रजनन आरोग्य चांगले राखण्यास मदत करतं. यासाठी तुम्ही ध्यान आणि योग यांची मदत घेऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.