Menstruation Postpone Pills ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Menstruation Postpone Pills : सावधान! मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळ्या खाताय? आरोग्यावर होऊ शकतो दुष्परिणाम

Women Taking Period Postpone Pills : महिला पाळीची तारीख मागे - पुढे ढकलण्यासाठी गोळ्यांचा वापर करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Periods Issue :

सणासुदीच्या काळात अनेक स्त्रिया मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळ्या खातात. यामुळे पाळी पुढे तर ढकली जाते. परंतु, यामुळे आरोग्यावर परिणाम देखील होतो.

विनाकारण गोळ्या खाल्ल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. यासाठी कोणत्याही गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. याबाबतची माहिती दिली आहे खराडी येथील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ मदरहुड हॉस्पीटलच्या डॉ. प्रीथिका शेट्टी यांनी. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या म्हणतात की, मासिक पाळी ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. जी स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्सनुसार मासिक पाळीचे चक्र सुरु ठेवते. स्त्रियांना अनेकदा अशा परिस्थितींचा सामना करावा लागतो जेथे त्यांच्या मासिक पाळीत महत्त्वाच्या घटना किंवा प्रवासात व्यत्यय येऊ शकतो. अशावेळी बऱ्याच महिला पाळीची तारीख मागे - पुढे ढकलण्यासाठी गोळ्यांचा वापर करतात. सुरुवातीला हा एक चांगला पर्याय म्हणून समजला जातो. परंतु काही काळानंतर याचा आपल्या हार्मोन्सवर परिणाम होतो.

मासिक पाळी लांबवण्याासाठी वापरण्यात येणारी औषधांचा (Medicine) आरोग्यावर दुष्परिणाम होतो. या गोळ्यामुळे आपल्या शरीराच्या नैसर्गिक चक्रामध्ये समस्या निर्माण होतात. मासिक पाळी हे असे चक्र आहे की त्याचा आपल्या शरीरातील विविध हार्मोन्स आणि क्रियांवर परिणाम होतो. या प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास अनेक दुष्परिणाम होतात. तज्ज्ञांच्या मते, या गोळ्यांचा सतत वापर केल्यास भविष्यात मासिक पाळी थांबू शकते किंवा प्रजननासंबंधीत समस्या उद्भवू शकतात.

मासिक पाळीत बदल झाल्याने हार्मोनल संतुलनावर परिणाम होतो. तसेच महिनाभर शरीरात हार्मोनल चढउतार होतात. ज्यामुळे मासिक पाळीच नाही तर मूड स्विंग्ज, शारीरिक ऊर्जेची पातळी आणि आरोग्याशी (Health) संबंधित इतर अनेक गोष्टींवर परिणाम होतो. यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो.

मासिक पाळी (Menstruation) लांबवल्याने त्या काळापर्यंत आराम मिळतो. परंतु, भविष्यात मासिक पाळीमध्ये अनियमितता दिसून येते. आपल्या जीवनशैलीत बदल करणे आणि संतुलित आहाराचे सेवन करणे हे नैसर्गिकरित्या मासिक पाळीचे नियमन करण्यास मदत करु शकते.

या गोळ्याचे सेवन अधूनमधून घेतल्यास त्याचा फारसा त्रास होत नाही. वारंवार घेतल्यास शरीरावर त्याचा परिणाम होतो. पाळी लांबविणाऱ्या या गोळ्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या. तसेच या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT