Hair Falls Problem : केस विंचरताना खूप गळतात? शेवग्याचा पानांचा वापर करा, महिन्याभरात झरझर वाढतील

Drumstick Leaves Benefits For Hair : शेवग्याची पाने फक्त केसांसाठीच नाहीतर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.
Hair Falls Problem
Hair Falls ProblemSaam Tv
Published On

Hair Care Tips :

केस गळण्याच्या समस्याचा त्रास अनेक महिलांना असतो. बदलते वातावरण आणि धावपळीमुळे अनेकांना केसांची काळजी घेता येत नाही. त्यामुळे केस गळणे, केसांचा वाढ न होणे अशा अनेक समस्या येतात. यासाठी आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश करा. त्यामुळे नक्की फरक पडेल.

चेहऱ्याचे खरे सौंदर्य हे केसांमुळे असते असे म्हटले जाते. अशातच सर्वांना लांबसडक आणि दाट केस हवे असतात. त्यासाठी आपण अनेक केमिकलयुक्त शॅम्पू वापरतो.त्यामुळे केसांना हानी पोहचते. परिणामी केस गळणे आणि केसांची वाढ खुंटण्याच्या समस्या होतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केस गळतीसाठी तुम्ही आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश करा. शेवग्याची पाने फक्त केसांसाठीच नाहीतर आरोग्यासाठीही (Health) फायदेशीर आहेत. महिनाभर या पानांचा वापर केला तर त्याचा केसांसाठी खूप फायदा होईल.

शेवग्याच्या शेंगामध्ये विटामीन ए जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. तसेच यात अँटीफंगल गुणधर्म असतो. ज्यामुळे पिंपल्स (Pimples) किंवा डाग अशा समस्या टाळता येतील.

Hair Falls Problem
Hair Care Tips : केस कोरडे पडतात, डोक्यात सतत खाज लागते? हे घरगुती उपाय करुन पाहाच

1. शेवग्याच्या पानांची पावडर

शेवग्याच्या पानांची पावडर ही बाजारात सहज उपलब्ध असते. यात तुम्ही मेंहदी पावडर, आवळा पावडर, भृंगराज पावडर आणि दही (Curd) घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना अर्धा तास लावा. त्यानंतर केस धुवा. यामुळे तुमचे केस दाट आणि काळेभोर होतील.

शेवग्याच्या पानात आयनचे प्रमाण खूप जास्त असते. यात विटामीन ए, बी , सी आणि बायोटिन असते. यात एमिनो अॅसिडचे प्रमाण असते. यामुळे केसांना खूप फायदा होतो. तसेच शेवग्यांच्या शेंगाची पाने घरच्या घरी वाटून लावल्याने केस खूप दाट होतील. तसेच यामुळे रक्तप्रवाहदेखील सुरळीत होतो.

Hair Falls Problem
Crimean-Congo Disease : कोरोनापेक्षाही भयंकर! या विषाणूच्या संसर्गामुळे डोळ्यांतून होतो रक्तस्राव, तज्ज्ञांचा दावा

जर तुम्हाला शेवग्याच्या पानांची पावडर किंवा पेस्ट करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही ही पाने चावून खाऊ शकता. शेवग्याची पाने चावून खालल्याने केसांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. रात्री झोपण्याआधी शेवग्याची पान चावून खा. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅरेटिन असते. हे केसांसाठी फायदेशीर असते. ज्यामुळे केसगळती थांबण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com