Heart attack problem in Marathi, heart attack symptoms in marathi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

स्त्री की, पुरुष : हृदयविकाराचा धोका सर्वाधिक कोणाला ?

सध्या हार्ट अँटॅकचा विळखा सिनेसृष्टीत अधिक तर आपल्याला पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण सतत हार्ट अँटॅकचे वाढलेले प्रमाण ऐकतो आहे. सध्या हा हार्ट अँटॅकचा विळखा सिनेसृष्टीत अधिक तर आपल्याला पाहायला मिळत आहे. (Heart attack causes in Marathi)

हे देखील पहा-

हार्ट अँटॅकचे (Heart attack) प्रमाण का वाढत आहे ? त्याचे नेमके कारण काय ? असे का होते ? हार्ट अँटॅकचे प्रमाण स्त्रीयांमध्ये अधिक असते की, पुरुषांमध्ये. त्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो हे जाणून घेऊया.

१. काही आजार हे फक्त स्त्रीयांना होऊ शकतात जसे की, एंडोमेट्रिओसिस, पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम, मधुमेह आणि उच्च रक्तदाब जो गर्भधारणेदरम्यान वाढू लागतो. ह्रदयाला व्यवस्थित रक्त पुरवठा न मिळाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. एंडोमेट्रिओसिसमुळे ४० वर्षांखालील महिलांमध्ये हृद्य रक्तवाहिन्यांचा विकार होण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे काहीवेळा हृदयविकाराचा झटका हा अनुवंशिक देखील असू शकतो.

२. रजोनिवृत्तीनंतर, इस्ट्रोजेनची पातळी कमी होईपर्यंत स्त्रियांना हृदयविकारापासून काही प्रमाणात संरक्षण मिळते. हृदयविकाराचा झटका येण्याचे सरासरी वय महिलांमध्ये (Womens) ७० आहे तर, पुरुषांमध्ये (Mens) ६६ आहे.

३. हृदयविकाराचा झटका येताना पुरुषांना अनेकदा छातीत दुखते परंतु त्यांना असे वाटते की, छातीवर दाब आल्यामुळे ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. तर, काही स्त्रियांना छातीत दुखणे जाणवत असते. तसेच त्यांना हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी तीन किंवा चार आठवड्या आधी वेगवेगळी सूक्ष्म लक्षणे दिसत असतात.

४. पुरुषांपेक्षा स्त्रीला हृदयविकाराचा झटका लवकर येत नाही. हृदयविकाराच्या झटक्यानंतर पुरुषांप्रमाणे स्त्रियांचाही कल नसतो. तसेच, ज्या स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येतो त्यांच्यामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाबमुळे या गोष्टी होऊ शकतात.

५. हृदयविकाराच्या झटक्यानंतर, स्त्रियांना रक्ताची गुठळी होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याची अधिक शक्यता असते. काही कारणांमुळे या रक्ताच्या गुठळ्या टाळण्यासाठी त्यांना औषध दिले जाण्याची शक्यता नसते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना काही महिन्यांच्या आत दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

SCROLL FOR NEXT