Viral News  Saam Tv
लाईफस्टाईल

Viral News : बाळाच्या जन्माच्या ४८ तासांआधीच महिला गरोदर असल्याचे समजले; डॉक्टरही चक्रावले

बाळाच्या जन्माच्या काही तास आधीच महिला गरोदर असल्याचे समजले असे होऊ शकते का?

कोमल दामुद्रे

Viral News : गरोदर असल्याचं महिलेला काहीच माहिती नाही असं होऊ शकतं का? किंवा बाळाच्या जन्माच्या काही तास आधीच महिला गरोदर असल्याचे समजले असे होऊ शकते का? हे असे प्रश्न विचारल्यानंतर एखादा सहाजिकच म्हणू शकतो की नाही. पण हे असं घडलंय. अमेरिकेच्या नेब्रास्कामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. बाळाच्या जन्माच्या ४८ तास आधी एका महिलेला ती गरोदर असल्याचे समजले. याबाबतचे वृत्त व्हायरल होत आहे.

ब्रिटिश वृत्तपत्र द सनच्या वृत्तानुसार, २३ वर्षीय महिला ही शिक्षिका आहे. ती गरोदर असल्याचे कोणतीही लक्षणे सुरुवातीला दिसली नाहीत. एके दिवशी अचानक तिला थकवा जाणवू लागला. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. नवीन नोकरी आणि त्यात जास्त काम, ताण यामुळे थकवा जाणवू लागला असावा, असं तिला वाटलं. (Latest Marathi News)

डॉक्टरांना धक्काच बसला

तिने सांगितले की, तिच्या पायाला सूज आली होती. त्रास जाणवू लागल्याने ती डॉक्टरांकडे (Doctor) गेली. यानंतर तिला कळले की बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंधांनंतर ती गरोदर राहिली. डॉक्टरांनी दोन चाचण्या केल्या. त्यानंतर ती आई होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर विश्वासच बसला नाही. मात्र, त्यानंतर केलेल्या काही वैद्यकीय चाचण्यांनंतर गरोदर असल्याची खात्री पटली, असंही तिने सांगितलं.

महिलेच्या किडनी आणि यकृत नीट काम करत नव्हते. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने सांगितले की, रक्तदाब लक्षणीय वाढला होता. डॉक्टरांनी सांगितले की तात्काळ संबंधित शस्त्रक्रिया (Operation) करावी लागेल आणि सुखरूप प्रसूती करावी लागेल. त्यामुळे सी-सेक्शनद्वारे प्रसूती झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT