Chikki Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Chikki Recipe : थंडीच्या दिवसात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थाची चव चाखायची आहे? ट्राय करा, इम्युनिटी बूस्टर चिक्की

कोमल दामुद्रे

How To Make Immunity Booster Chikki :

हिवाळ्यात तापमानात अनेक प्रकारचे बदल होतात. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे या काळात सर्दी आणि खोकल्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात आपल्याला आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करण्यास सांगितले जाते.

थंडीच्या (Winter Season) दिवसात तंदुरुस्त राहायचे असेल तर शेंगदाण्याची चिक्की फायदेशीर ठरतील. शेंगदाण्यामध्ये अधिक प्रकारचे पोषकतत्व असतात. ज्याचा आरोग्याला (Health) फायदा होतो. जर तुम्हाला हिवाळ्यात हेल्दी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर शेंगदाण्याची चिक्की ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी (Recipes). ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • १५० ग्रॅम भाजलेले शेंगदाणे

  • वेलची पावडर

  • तूप

  • चिक्की गूळ

  • सुका मेवा

  • खसखस

  • तीळ

  • बेकिंग सोडा

2. कृती

  • इम्युनिटी बूस्टर चिक्की बनवण्यासाठी एका पॅनमध्ये ड्रायफ्रुट्स, खसखस, तीळ आणि शेंगदाणे टाकून तळून घ्या.

  • आता एका कढईत तूप घाला आणि गूळ वितळण्यासाठी चमच्याने सतत ढवळत राहा, म्हणजे गूळ चिकटणार नाही आणि जळणार नाही.

  • गूळ वितळला की त्यात खाण्याचा सोडा टाकून चांगला फेटा.

  • गुळाचा सरबत तयार झाला की त्यात सर्व भाजलेले ड्रायफ्रुट्स, तीळ, खसखस, शेंगदाणे आणि वेलची पूड घालून मिक्स करा.

  • आता एका ट्रेमध्ये तूप लावून गुळ आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवलेली चिक्की ट्रेमध्ये टाका.

  • ट्रेमध्ये चिक्की पसरवल्यानंतर लगेच चाकूच्या साहाय्याने कापून घ्या. नंतर सर्व्ह करा शेंगदाण्याची चिक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT