Ginger Halwa Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Ginger Halwa Recipe : हिवाळ्यात राहाल हिट आणि फिट! घराच्या घरी ट्राय करा आल्याचा शिरा, चव चाखून तर पाहा

How To Make Ginger Halwa : आल्यामध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. अशातच जर तुम्हालाही हेल्दी राहायचे असेल तर आल्याचा शिरा ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी

कोमल दामुद्रे

Winter Recipe :

हिवाळा म्हटलं की, अनेक आजार उद्भवण्याची समस्या असते. अशातच सर्दी-खोकला, ताप आणि संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. वातावरणातील बदल आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी.

बरेचदा सर्दी-खोकला झाल्यानंतर आपण आल्याचे सेवन करतो. आलं हिवाळ्यात हिट आणि फिट राहाण्यास मदत करते. तसेच यापासून विविध पदार्थ बनवून त्याची चवही चाखता येते. आल्यामध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. अशातच जर तुम्हालाही हेल्दी राहायचे असेल तर आल्याचा शिरा ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) (How To Make Tasty and Healthy Ginger Halwa)

1. साहित्य

  • आलं (Ginger) - ५०० ग्रॅम

  • गूळ - २५० ग्रॅम

  • तूप - १०० ग्रॅम

  • काजू

  • बदाम

  • मनुका

  • अक्रोड

  • सुका मेवा

2. कृती

  • आल्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम चांगले धुवून घ्या.

  • धुऊन झाल्यावर त्याची पेस्ट तयार करा.

  • कढईत किंवा लहान पातेल्यात तूप टाकून गरम करा.

  • थोडा वेळ गरम केल्यानंतर त्यात आल्याची पेस्ट तयार करा.

  • त्यात आल्याची पेस्ट घालून चांगली तळून घ्या.

  • त्यानंतर गूळ घालून लालसर होईपर्यंत शिजवून घ्या.

  • आता त्यात काजू, बदाम, बेदाणे, अक्रोड आणि इतर ड्रायफ्रुट्स घाला.

  • हे सर्व मिक्स करुन चांगले शिजू द्या. त्यातील सगळे पाणी (Water) सुकल्यानंतर गॅस बंद करा.

  • तयार आहे गरमा गरम आल्याचा पौष्टिक आणि हेल्दी शिरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT