Winter Care Tips : हिवाळ्यात मुळ्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मुळा पोषक तत्वांनी भरपूर आहे. मुळ्याचे सेवन अनेक आजारांवर फायदेशीर ठरते. पण तुम्हाला माहित आहे का की मुळासोबतच मुळ्याच्या पानांचे सेवन देखील फायदेशीर आहे. जर तुम्ही मुळ्याच्या पानांचा ज्यूस बनवून प्यायला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, क्लोरीन, सोडियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन (Vitamins) सी सारखी आवश्यक पोषक तत्त्वे मुळ्याच्या पानांमध्ये आढळतात. जे हिवाळ्यात होणाऱ्या अनेक समस्यांपासून शरीराचे रक्षण करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात मुळ्याच्या पानांचा रस पिण्याचे नेमके फायदे (Benefits) कसे आहेत. (Radish juice benefits)
हिवाळ्यात मुळ्याच्या पानांचा रस पिण्याचे 6 फायदे
1. वजन कमी करण्यास उपयुक्त
वाढत्या वजनामुळे अनेक आजार होऊ शकतात आणि आपल्या समस्या वाढवू शकतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मुळ्याच्या पानांचा रस पिणे फायदेशीर ठरते. कारण यामध्ये असलेले घटक वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
2. पचनसंस्था मजबूत होते
पचनाशी संबंधित समस्या असल्यास मुळ्याच्या पानांचा रस पिणे फायदेशीर ठरते. कारण मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था मजबूत करते आणि पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यात मदत करते.
3. कमी रक्तदाबावर फायदेशीर
कमी रक्तदाबाची समस्या असल्यास मुळ्याच्या पानांचा रस पिणे फायदेशीर ठरते. कारण मुळ्याच्या पानांमध्ये सोडियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब वाढविण्यात मदत करते.
4. प्रतिकारशक्ती मजबूत
मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर पोषक असतात, त्यामुळे मुळ्याच्या पानांच्या रसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ज्याद्वारे व्हायरस आणि बॅक्टेरियापासून आपण बचाव करु शकतो.
5. त्वचेसाठी फायदेशीर
मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्याने त्वचेलाही अनेक फायदे होतात. कारण मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या जसे की त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, पिंपल्स दूर होतात.
6. रक्ताची कमतरता
अशक्तपणा असल्यास मुळ्याच्या पानांचा रस पिणे फायदेशीर ठरते. कारण मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.