Carrot Beetroot Halwa  Saam tv
लाईफस्टाईल

Carrot Beetroot Halwa : हिवाळ्यात खा बीटरुट-गाजर हलवा, हेल्दीही आणि पौष्टिकही; पाहा रेसिपी

कोमल दामुद्रे

How To Make Carrot Beetroot Halwa :

हिवाळ्यात बाजारात आपल्याला बीटरुट आणि गाजर पाहायला मिळतात. बीटरुट-गाजर सुपरफूड म्हटलं जाते. रोजच्या आहारात सलाड, कोशिंबीर या स्वरुपात बीट आणि गाजरचा आपल्या आहारात समावेश असायला हवा. पण तुम्हाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नवीन रेसिपी ट्राय करु शकता.

बीटरुट आणि गाजरपासून ज्यूस, टिक्की किंवा भाजीची चव चाखली जाते. पण आम्ही आज तुम्हाला बीटरुट आणि गाजरपासून हलवा कसा बनवायचा याविषयी सांगणार आहोत. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघेल तसेच आरोग्याला (Health) अनेक फायदा होईल. जाणून घेऊया रेसिपी (Recipes).

1. साहित्य

  • 500 ग्रॅम किसलेले गाजर

  • 500 ग्रॅम किसलेले बीटरूट

  • एक कप दूध (Milk)

  • अर्धा कप चांगली पावडर

  • १/४ कप देशी तूप

  • बारीक चिरलेला काजू

2. कृती

  • सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवून त्यात किसलेले बीटरूट आणि गाजर घाला.

  • ८ ते १० मिनिटे रंगबदेलपर्यंत चांगले शिजवून घ्या.

  • त्यात एक कप दूध घालून त्यात गाजर आणि बीटरुट शिजवून घ्या.

  • दूध पूर्णपणे आटोस्तोवर शिजवून घ्या.

  • सतत ढवळत राहा ज्यामुळे तव्याच्या तळाला चिकटणार नाही. त्यात गूळ पावडर घाला. त्यानंतर त्यात तूप घाला.

  • मिश्रण पूर्णपणे कोरडे होईपर्यंत ढवळत राहा. त्यात वरुन काजू, बेदाणे, पिस्ते घाला.

  • गरमागरम सर्व्ह करा गाजर-बीटरुटचा हलवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT