Winter Care Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Care : थंडीत ड्रायफ्रुट्स खाताय ? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...

हल्ली काहींच्या दिवसाची सुरुवात ही गरमा गरमा चहाने होते तर काहींची सुकामेव्याने.

कोमल दामुद्रे

Winter Care : लहानपणी शाळेत जाताना थंडीच्या काळात हातावर हमखास ठेवायची तो सुकामेवा. यामुळे शरीरातील उष्णता टिकून राहाते. परंतु, हल्ली काहींच्या दिवसाची सुरुवात ही गरमा गरमा चहाने होते तर काहींची सुकामेव्याने. दिवसभर शरीराला (Health) ऊर्जावान ठेवण्यासाठी आपण अनेक पदार्थांचे सेवन करतो.

नुकतीच सुरु झालेली थंडी व वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीराला अधिक उष्ण व पोषक घटक हवे असतात. त्यासाठी आपण मेथी, डिंक, तीळ याचे आहारात सेवन करायला सुरुवात करतो. तसेच ड्रायफ्रुट्स व नाचणी व बाजरीसारख्या पिठाचे देखील या ऋतूमध्ये आहारात समावेश करतो.

थंडीच्या काळात लहान (Child) मुलांपासून ते मोठ्या सुकामेवा खाण्यास दिला जातो. परंतु, सुकामेवा कधी खावा, तो कशा पद्धतीने खाल्ला जातो, याचा आपल्या शरीराला कसा फायदा होते हे आजही कोणाला माहित नाही. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल.

1. सुकामेवा हा फॅटस, प्रोटीन आणि फायबर युक्त आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता टिकून राहाते. तसेच हा काही प्रमाणात पचण्यास जड असतो. त्यामुळे याचे सेवन करताना निदान 6 ते 8 तास पाण्यात भिजवून खायला हवा. भिजवल्यामुळे त्यातील उष्णता निघून जाते व ते पचण्यास हलके होते.

2. कधी कधी कामाच्या गडबडीमुळे सुकामेवा भिजवायला आपण विसरतो अशा वेळी आपण त्याला पॅनवर किंवा कढईमध्ये हे ड्राय फ्रूटस भाजून खाल्ल्यास पचायला हलके होतात.

3. सुकामेवा हा शक्यतो सकाळी उठल्यावर किंवा 12 वाजेपर्यंत तर सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत याचे सेवन केल्यास शरीराला फायदा होतो. तसेच संध्याकाळी स्नॅक्सच्या वेळी याचे सेवन करु शकतो.

4. दिवसात याचे किती प्रमाणात सेवन असायला हवे हा प्रश्न अनेकांना पडतो. तर अशावेळी ज्यांना पचनाशी निगडीत तक्रारी नाहीत, हिटचा त्रास नाही किंवा जे व्यवस्थित पाणी पितात. जे नियमितपणे व्यायाम करतात आणि ज्यांना आरोग्याच्या इतर काही तक्रारी नाहीत त्यांनी मूठभर सुकामेवा रोज खायला हरकत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात; पहिल्या दोन षटकात पाकिस्तानचे दोन फलंदाज गारद

Crime: अरविंदचं तिसरं लग्न, नंदिनीचा पाचवा नवरा; भररस्त्यात डोक्यात गोळ्या झाडल्या, फेसबुकवर लाईव्ह करत...

Face Care: महागडे फेसवॉश वापरण्यापेक्षा या घरगुती सामग्रीने चेहरा धुण्यास करा सुरुवात, मिळेल सोफ्ट ग्लोईंग स्किन

Akola : मूकबधिर मुलीवर राहत्या घरात विनयभंग, तोंडावर रुमाल दाबून गळा दाबला; अकोल्यात भयकंर घडलं

MVP Annual Meeting: नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वार्षिक सभेत राडा|VIDEO

SCROLL FOR NEXT