Winter Health Care : हिवाळ्यात सर्दी-खोकला होतोय ? तर, 'या' सुपरफूड्सला करा डाएटमध्ये सामील !

वातावरणातील बदलामुळे आहारातही बदल होतो. तसेच अनेक आजार होण्याची देखील शक्यता असते.
Winter Health Care
Winter Health CareSaam Tv
Published On

Winter Health Care : हल्ली जवळपास सर्वत्र थंडीचा हंगाम सुरु झाला आहे. हा गारवा जितका सुखद असतो तितकाच तो घातकही. वातावरणातील बदलामुळे आहारातही बदल होतो. तसेच अनेक आजार होण्याची देखील शक्यता असते. अचानक बदलेल्या वातावरणामुळे शरीराला हवी असणारी रोगप्रतिकारशक्ती आपल्याजवळ नसते त्यामुळे आपण अनेक संसर्गजन्य आजारांना (Disease) सहज बळी पडतो.

हिवाळ्यात अशा गोष्टींचा आहारात समावेश केला जातो, जे खाल्ल्याने आपल्या शरीराला उष्णता मिळते. हिवाळ्यात सर्वाधिक आजारी पडण्याचा धोकाही असतो. खोकला, सर्दी, ताप हे आजार प्रामुख्याने या ऋतूमध्ये होणारे असतात. पण जर तुमचा आहार चांगला असेल तर तुम्हाला या समस्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञ हिवाळ्यात पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देतात.

Winter Health Care
Winter Health Care : हिवाळ्यात स्नायूंच्या आरोग्याची चिंता वाटतेय? समतोल आहाराचे सेवन करा आणि तंदुरुस्त रहा

1. हिरव्या पालेभाज्या

Green Vegetables
Green VegetablesCanva

हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. पालक, मेथी, पुदिना आणि विशेषतः हिरवा लसूण यांचा आहारात समावेश करा. हिरव्या पालेभाज्या शरीरातील उष्णता त्वरित वाढवतात ज्यामुळे वातावरणातील गारव्यात आपले आरोग्य टिकून राहाते. हिवाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करतात.

2. देशी तूप

Ghee
GheeCanva

तुपासोबत डाळ, भात, रोटी वगैरे वर टाकून खा. तूप जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबीचा एक अमूल्य स्रोत आहे. हिवाळ्यात आहारात तूप घेणे हे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचा एक सोपा उपाय आहे.

Winter Health Care
Winter Health Tips : सर्दी-खोकल्यात चुकूनही खाऊ नका 'ही' फळे, घश्याला आणखी त्रास होण्याची शक्यता

3. गाजर

carrot
carrot canva

निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हिवाळ्यातील भाज्या खूप महत्त्वाच्या असतात. गाजर हे यापैकी एक आहे. एका संशोधनानुसार, जे लोक तीन आठवड्यांपर्यंत दररोज सुमारे एक कप गाजर खातात त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

4. नट

Nut
Nut Canva

नटांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम आणि जस्त यांसारखी अनेक खनिजे असतात. शेंगदाणे, बदाम, काजू, पिस्ता आणि खजूर हिवाळ्यातही फायदेशीर (Benefits) ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com