Winter Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Care Tips : हिवाळ्यात गुडघे आणि सांधे दुखीचा त्रास वाढलाय? असू शकते कॅल्शियमची कमतरता, वेळीच घ्या काळजी

Calcium Deficiency : कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे कोणती? होणारे आजार कोणते? आहारात कोणते पदार्ख खायला हवे जाणून घेऊया. कॅल्शियममुळे आपली हाडे आणि सांधे मजबूत आणि निरोगी ठेवण्याचे काम करते.

कोमल दामुद्रे

Calcium Deficiency :

हिवाळा म्हटलं की, अनेक दुखणी वर येतात. त्यातील सगळ्यांना सामान्य व वयोमानानुसार उद्भवणार म्हणजे गुडघे आणि सांधे दुखी. पण हे दुखणे अगदी कमी वयात सुरु झाले तर...

शरीर निरोगी राहावे यासाठी त्यांची योग्य प्रमाणात काळजी घेतो. शरीर निरोगी राहाण्यासाठी जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे, प्रथिने यांची आवश्यकता असते. कोणत्याही एका पोषक तत्वाची कमतरता झाली की, आरोग्यावर (Health) त्याचा वाईट परिणाम होतो.

या पोषकतत्वांमधील एक घटक कॅल्शियम. कॅल्शियममुळे आपली हाडे आणि सांधे मजबूत आणि निरोगी ठेवण्याचे काम करते. याशिवाय दातांसोबत रक्तपेशी मजबूत होण्यास मदत होते. शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यास हाडे कमकुवत होतात. कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे कोणती? होणारे आजार (Disease) कोणते? आहारात कोणते पदार्ख खायला हवे जाणून घेऊया.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात?

1. मुडदूस

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला मुडदूस होण्याची शक्यता अधिक असते. या आजारात तुमची हाडे खूप मऊ आणि लवचिक होतात. त्यामुळे हात आणि पायाची दुखणे वाढते. जर व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुडदूस झाला असेल पुरेसा आहार घेतला तर आजार बरा होऊ शकतो.

2. ऑस्टियोपोरोसिस

ऑस्टियोपोरोसिस म्हणजे हाडे कमकुवत होणे. जर तुम्ही तुमच्या आहारात कॅल्शियम कमी प्रमाणात घेत असाल तर तुमची हाडे झपाट्याने कमकुवत होतील. यामध्ये सुरुवातीला पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी अशी समस्या जाणवू लागते. ज्याकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम गंभीर होतात.

3. स्नायूंना क्रॅम्प्स

जर तुम्हाला अचानक चालताना किंवा उठा-बसता स्नायूंमध्ये क्रॅम्पस येत असतील तर शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली आहे. हे याचे पहिले लक्षण आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू मऊ होतात. ज्यामुळे क्रॅम्प्सचा धोका अधिक वाढतो.

या पदार्थांचे आहारात नियमित सेवन करा

शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. यासाठी आहारात जर्दाळू, किवी, दही, संत्री, दूध, चीज यांसारख्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT