Bad cholesterol treatment saam tv
लाईफस्टाईल

Bad cholesterol treatment: साचलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल वितळणार आणि गोळ्यांपासूनही सुटका? LDL कमी करण्याची एका डोसची ही नवीन थेरपी जाणून घ्या

VERVE-102 ही LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी विकसित केली जाणारी नवीन जीन-एडिटिंग थेरपी आहे. एका डोसनंतर दीर्घकाळ परिणाम मिळू शकतो का याचा क्लिनिकल ट्रायलमध्ये अभ्यास सुरू आहे. ही थेरपी अद्याप सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध नाही

Surabhi Jayashree Jagdish

बॅड कोलेस्ट्रॉलच्या उपचारासाठी VERVE-102 जीन थेरपीची सध्या चर्चा सुरू आहे. ही थेरपी अमेरिकेतील Verve Therapeutics या बायोटेक कंपनीने विकसित केलीये. हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांवर दीर्घकाळ परिणाम करणारे उपचार विकसित करण्यावर ही कंपनी काम करतेय.

VERVE-102 ही सध्या संशोधन आणि क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहे. केवळ एका डोसमुळे LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येईल का याचा या उपचाराद्वारे अभ्यास केला जातोय.

काय आहे VERVE-102?

VERVE-102 नेमकी काय आहे, ती शरीरात कशी काम करते, आतापर्यंतच्या ट्रायलमध्ये कोणते परिणाम दिसले आहेत आणि या थेरपीमुळे कोलेस्ट्रॉलच्या औषधांची गरज कमी होऊ शकते का, हे जाणून घेऊया.

बॅड कोलेस्ट्रॉल का ठरतं धोकादायक?

बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढणं ही आज अनेकांसाठी चिंतेची बाब आहे. शरीरातील LDLचं प्रमाण जास्त झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये साचू शकतं. कालांतराने यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचा वापर केला जातो. मात्र अनेक लोकांसाठी वाढलेलं कोलेस्ट्रॉल दीर्घकाळ नियंत्रणात ठेवणं हे आव्हान ठरू शकतं.

VERVE-102 जीन थेरपी म्हणजे काय?

नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटचे सीईओ डॉ. ओपी यादव यांच्या माहितीनुसार, VERVE-102 ही एक नवीन जीन-एडिटिंग थेरपी असून सध्या तिची क्लिनिकल चाचणी सुरू आहे. शरीरातील LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याच्या उद्देशाने ही थेरपी विकसित करण्यात आलीये. ही थेरपी नसांमधून दिली जाते. काही तासांच्या प्रक्रियेनंतर हे औषध रक्ताच्या माध्यमातून लिव्हरच्या पेशींपर्यंत पोहोचतं.

या थेरपीमध्ये खास प्रकारचे mRNA आणि गाइड RNA वापरले जातात. हे लिव्हरमध्ये असलेल्या PCSK9 जीनची ओळख पटवण्यास मदत करते. लिव्हरच्या पेशींमध्ये गेल्यानंतर mRNAच्या मदतीने एक खास प्रकारचं बेस एडिटर प्रोटीन तयार होतं. हे प्रोटीन गाइड RNAच्या मदतीने PCSK9 जीनपर्यंत पोहोचतं आणि त्या जीनच्या DNAमध्ये एक विशिष्ट बदल करतं.

यामागचा उद्देश लिव्हरमधील PCSK9 जीनची क्रिया बंद करणं किंवा कमी करणं हा आहे. PCSK9ची क्रिया कमी झाल्यास लिव्हर रक्तातून अधिक प्रमाणात LDL काढून टाकण्यास मदत करू शकतो. त्यामुळे एकदाच डोस दिल्यानंतर बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी दीर्घकाळ कमी राहू शकते, अशी अपेक्षा आहे.

VERVE-102 च्या ट्रायलमध्ये आतापर्यंत काय परिणाम दिसले?

Verve Therapeuticsच्या माहितीनुसार, VERVE-102 चा Heart-2 Phase 1b ट्रायल अशा लोकांवर केला जातोय. ज्यांच्या कुटुंबात अत्यंत जास्त कोलेस्ट्रॉलची समस्या आहे किंवा ज्यांना कमी वयातच हार्ट अटॅकचा धोका आहे. आतापर्यंत 14 जणांच्या सुरुवातीच्या डेटामध्ये वेगवेगळ्या डोसनंतर LDLच्या पातळीत घट झाल्याचं दिसून आलं.

  • कमी डोस दिलेल्या रुग्णांमध्ये LDL सुमारे 21 टक्क्यांनी कमी झाला.

  • दुसरा डोस घेतलेल्या गटात LDLमध्ये सुमारे 41 टक्क्यांची घट दिसली.

  • सर्वाधिक डोस घेतलेल्या गटात LDL सुमारे 59 टक्क्यांनी कमी झाला.

  • एका व्यक्तीमध्ये LDLची पातळी तब्बल 69 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं दिसून आलं.

कंपनीच्या माहितीनुसार, VERVE-102 दिल्यानंतर शरीरातील PCSK9च्या पातळीतही घट झाल्याचं दिसून आलं. हे सर्व निष्कर्ष सध्या प्राथमिक टप्प्यातील आहेत. ही थेरपी किती सुरक्षित आहे आणि तिचा परिणाम किती काळ टिकतो, हे निश्चितपणे सांगण्यासाठी पुढील क्लिनिकल ट्रायलची गरज आहे.

VERVE-102 मुळे कोलेस्ट्रॉलच्या औषधांची गरज कमी होईल का?

डॉ. ओपी यादव यांच्या मते, VERVE-102चा उद्देश असा उपचार विकसित करणं आहे जो वारंवार घ्यावा लागणार नाही. भविष्यातील ट्रायलमध्ये ही थेरपी सुरक्षित आणि प्रभावी ठरल्यास काही रुग्णांना रोज किंवा वारंवार घ्याव्या लागणाऱ्या कोलेस्ट्रॉलच्या औषधांची गरज कमी होऊ शकणार आहे.

सध्या ही थेरपी संशोधन आणि क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहे. तिचा दीर्घकालीन परिणाम आणि सुरक्षितता याबाबत अजून अधिक माहिती गोळा करणं आवश्यक आहे. VERVE-102 ही सध्या सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध असलेली उपचारपद्धती नाही.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद

पहिलीच डिलिव्हरी होती अन् बाळाला कडेवर घ्यायच्या वयात...; बीडमधील 'त्या' घटनेने महाराष्ट्र सुन्न

Pune : स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरूचं भयंकर कांड, तरुणीला मागीतले अर्धनग्न फोटो; पुण्यात भोंदू बाबाचा पर्दाफाश

Vangani Waterfall : धबधबा, ट्रेकिंग अन् अ‍ॅडव्हेंचर; वांगणीजवळील 'हे' ठिकाण पावसाळ्यात फिरायला आहे खास

Antara Banerjee : "ती मी नव्हेच..."; RPF कर्मचाऱ्यावर हल्ल्याप्रकरणी अभिनेत्री अंतरा बॅनर्जीचं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT