आजकाल इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. काहीजण महिन्याला रिचार्ज करुन त्याचा वापर करतात तर काहीजण घरातच वायफाय लावतात. सध्याच्या काळात वाढत्या वर्क फ्रॉम होममुळे घरुन काम करण्याची सवय अनेकांना लागली आहे. त्यासाठी घरात आपण वायफाय लावतात.
फोन किंवा लॅपटॉपला (Laptop) वायफाय कनेक्ट झाला की, पुन्हा पासवर्ड टाकायची गरज भासत नाही. त्यामुळे अनेकदा वायफायचा पासवर्ड आपल्या लक्षात राहात नाही. त्यामुळे अनेकांना अडचणींचा समाना करावा लागतो. पण आम्ही काही सोप्या टीप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने वायफाय पासवर्ड लक्षात ठेवणे अधिक सोपे होईल. जर तुम्हाला पासवर्ड कोणासोबत शेअर करायचा असेल तर तुम्ही ते देखील करु शकता.
1. अँड्रॉइड फोनसाठी या टिप्स (Tips) फॉलो करा
अँड्रॉइड फोनमध्ये वायफायचा पासवर्ड जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेटिंगमध्ये जावे लागेल. यामध्ये तुम्हाला वायफायचा पर्याय दिसेल. यानंतर तुमचा वायफाय कोणत्या नेटवर्कशी कनेक्ट यापूर्वी होता हे पाहा. वायफाय नेटवर्कवर (Network) गेल्यावर तुम्हाला शेअर किंवा वायफाय क्यूआर कोडचा पर्याय दिसेल. यानंतर तुमच्या स्क्रीनवर QR कोड दिसेल. त्यानंतर तुम्हाला वायफायचा पासवर्ड देखील दिसेल. जर इतर कोणाला तुमच्या वायफायला कनेक्ट करायचे असेल तर फक्त QR कोड स्कॅन करावा लागेल.
2. आयफोन युजर्स कसे कनेक्ट कराल?
जर तुम्ही आयफोन युजर्स असाल तर यासाठी काही वेगळ्या स्टेप्स असणार आहेत. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेटिंगमध्ये जाऊन वायफाय या पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर कनेक्टेड नेटवर्क पर्यायावर जावे लागेल. यामध्ये तुम्हाला छोटा i आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फेस आयडी किंवा टच आयडीच्या पर्यायावर क्लिक करा. ऑटो-जॉईन पर्यायाच्या खाली नेटवर्क पासवर्ड दिसेल. तो सेव्ह केल्यानंतर तुम्ही इतर वापरकर्त्यांसोबत शेअर करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.