लाईफस्टाईल

Swelling Issues : सकाळी हात पाय सुन्न पडतात? कारणं आणि उपाय जाणून घ्या

Hand Swelling : सकाळी हात पाय सुजणे, सुन्न होणे ही लक्षणं दुर्लक्षित करू नका. थंडी, रक्ताभिसरणातील अडथळे, व्हिटॅमिन कमतरता यामुळे त्रास होतो. योग्य आहार व उपायांनी ही समस्या कमी होऊ शकते.

Sakshi Sunil Jadhav

  • सकाळी हात पाय सुजणे ही सामान्य पण गंभीर समस्या असू शकते.

  • रक्ताभिसरणातील अडथळे, थंडी किंवा नसांवरील दाब यामुळे त्रास होतो.

  • व्हिटॅमिन बीची कमतरता ही मोठं कारण ठरते.

  • आहारात सुधारणा आणि तज्ज्ञ सल्ला आवश्यक.

सध्याची जीवनशैली प्रचंड धावपळीची झाली आहे. त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात थकव्याला सामोरे जावे लागते. मात्र थकवा ही समस्या सगळेच जण हलक्यात घेत असतात. आता त्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते. एक सामान्य वाटणारी समस्या म्हणजे सकाळी उठताच हात पाय सुजणे. अधूनमधून ही समस्या घडत असते. जर ही समस्या वारंवार तुम्हाला वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

तुम्ही थंड वातावरणात झोपत असाल तर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. कारण थंडाव्यात हदयावर ताण येतो आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजचा पुरवठा कमी होतो. जेव्हा अवयवांमध्ये रक्तप्रवाह नीट होत नाही, तेव्हा शरीराचे अवयव सुन्न व्हायला सुरुवात होते. ही सुन्नता थंडीमुळे होत असेल तर पुढील उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील.

हाताला किंवा पायांना मुंग्या येतात तेव्हा ते सुन्न झालेले असतात. कारण अशक्तपणा म्हणजेच तुमच्यात रक्ताची कमतरता नसांमध्ये अडथळा देखील असू शकते. ही समस्या वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. त्यासाठी तुम्हाला आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्याने तुमच्या शरीरातली रक्ताची पातळी वाढेल. यामध्ये मानेच्या किंवा मणक्याच्या नसांवर दाब आल्याने ही समस्या उद्भवू शकते. संधिवातामुळे, काही दुखापत किंवा बराच वेळ चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे नसांवर हा परिणाम होतो. त्यामुळे शरीराचे अवयव सुन्न होत असतात.

व्हिटॅमिन बीची कमतरता असल्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते. त्यामुळे बधीरता किंवा मुंग्या येणे या समस्या उद्भवतात. त्यासाठी तुम्ही केळी, पालक, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि मोड आलेले कडधान्यांचा आहार घ्या. तसेच मधुमेही रुग्णांना हा त्रास अनेकदा सहन करावा लागतो. अशावेळेस तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT