Drinking water after meals SAAM TV
लाईफस्टाईल

Drinking water after meals: जेवणानंतर लगेच पाणी पिताय? वाचा तुमची ही सवय आरोग्यासाठी किती ठरतेय धोकादायक

Right time to drink water after eating ayurveda: जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय पचनक्रिया मंदावू शकते, वजन वाढवू शकतं आणि पोषक घटकांच्या शोषणावर परिणाम करू शकते. आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ आणि आरोग्यदायी सवयी जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय संस्कृतीत आयुर्वेदानानुसार, जेवणासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आपल्यापैकी अनेकांना जेवण संपताच एक ग्लास पाणी गिळण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का तुमची ही सवय तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतेय.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुमची ही सवय तुमच्या पचनावर परिणाम करते. जेवणानंतर लगेच पाणी पिणं हानिकारक का मानलं जातं आणि त्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते जाणून घेऊया.

पचन हळू होणं

पोटातील डायजेस्टिव्ह एंझाइम आणि गॅस्ट्रिक ज्यूस पाण्यामुळे पातळ होतात. ज्यामुळे अन्नाचं पचन मंदावू लागतं. यामुळे गॅस, आम्लता, पोटफुगी आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.

इन्सुलिनच्या लेवलवर परिणाम

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरात इन्सुलिनची पातळी वाढू शकते. ज्यावेळी अन्नाचं योग्यरित्या पचन होत नाही तेव्हा ते ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतं. अशावेळी चरबी म्हणून ते शरीरात साठवलं जातं. यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतोच परंतु ब्लड शुगरच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो.

पौष्टिक घटकांची कमी

पचनक्रियेदरम्यान जीवनसत्त्वं, खनिजं आणि प्रोटीन यांसारखे पोषक घटक आतड्यांमध्ये शोषले जातात. अशावेळी जर पचन योग्य नसेल तर शरीर अन्नातील पोषक घटक योग्यरित्या शोषून घेतले जात नाही. त्यामुळे अशक्तपणा येण्याचा धोका असतो.

जेवण्याची योग्य पद्धत

  • जेवणाच्या ३० मिनिटं आधी आणि जेवणानंतर किमान ४० मिनिटं पाणी प्यावं.

  • जर जेवताना तुमचा घसा कोरडा किंवा तिखट वाटत असेल तर तुम्ही कोमट पाणी किंवा ताक एक किंवा दोन घोट पिऊ शकता.

  • पचन सुधारण्यासाठी आणि पोषक तत्वांचं योग्य पद्धतीने शोषण व्हावं म्हणून अन्न नीट चावून खाल्लं पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Breaking : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुन्हा रूग्णालयात दाखल करणार

Ajit Pawar Death : अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

Kandyache Muthe Recipe : कांद्याचे मुठे अन् गरमागरम भाकरी; रविवारचा गावरान बेत, वाचा सिंपल रेसिपी

Bigg Boss Marathi 6 : विजेतेपदाच्या शर्यतीतून 'हा' दावेदार बाहेर; बिग बॉसमध्ये शॉकिंग एलिमिनेशन, नाव वाचताच बसेल मोठा धक्का

SCROLL FOR NEXT