Double Depression google
लाईफस्टाईल

Women Stress: कामाचा ताण की मानसिक तणाव? महिलांच्या चिडचिडीचं नेमकं कारण वाचा सविस्तर

Double Depression : महिलांना सगळेच पुरुष कटकटी, चिडचिड करणारी किंवा सतत रडत बसणारी असे समजतात. मात्र यामागे एक आजार सुद्धा असू शकतो. पुढे आपण या बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

Saam Tv

Depression In Women: आपल्या प्रत्येकाच्या एक तरी महिला असते. पुरुष आणि महिला एकत्र येऊन घर चालवत असतात. अशा वेळेस त्यांच्या वागण्याने बोलण्याने काही निर्णय होतात. पण त्यामधली व्यक्ती जर सतत चिडत असेल. तर एकट्याने समजून घेणं कठीण होऊन जातं. यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त असतं. महिलांना सगळेच पुरुष कटकटी, चिडचिड करणारी किंवा सतत रडत बसणारी असे समजतात. पण हा एक आजार असू शकतो. त्यामध्ये महिलांना double depression होण्याचा सुद्धा धोका असू शकतो. पुढे आपण याच्याच बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

सध्या महिला पुरुषांसारख्याच नोकरी करत आहेत. अशा वेळेस त्यांना घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टी पाहाव्या लागतात. या कामाच्या ताणामुळे महिलांना प्रचंड स्ट्रेस येऊ शकतो. त्याचसोबत त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो, मूड स्विंग्ज होतात, रडू येतं, निराश वाटतं. याचाच परिणाम त्यांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो. याचं नेमकं कारण काय हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

महिलांची सतत चिडचिड का होते?

1. कामाचा ताण - महिलांना त्यांच्या नोकरीसोबत घरातली कामं, घरी गेल्यावर मुलांची कामं, स्वयंपाक, घरातली आवराआवर, आजारपणं अशा सगळ्या कामांचा महिलांवर भार येतो.

2. मुलांसाठी वेगळा वेळ काढणे - घरामध्ये जर मुलं असतील तर महिलांना त्याच्या धावपळीतून वेळ काढावाच लागतो. त्यामध्ये त्यांचे जेवण, अभ्यास, दिवसभराची चर्चा, प्रोजेक्ट ही व्यवधानं महिलांना सांभाळावीच लागतात.

3. कामाची वेळ पाळणे - महिलांनी त्यांच्या कामामुळे धकवा जास्त प्रमाणात येतो. त्याने ऑफीससाठी वेळ किंवा स्वत: साठी वेळ पुरत नाही.

4. सगळ्या कामाची जबाबदारी घेणे - महिलांना सगळ्या कामाची जबाबदारी स्वत: वर घ्यायला आवडते. त्याने पुढे ताण वाढतो.

5.आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे - महिला नेहमीच आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. त्याने भविष्यात त्यांना मोठा फटका बसू शकतो.

महिलांच्या ताणावर त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच उपाय काढू शकत नाही. पण यामुळे त्यांना double depression होण्याचा सुद्धा धोका असू शकतो. ज्यांना Persistent Depressive Disorder (PDD) म्हणजेच दीर्घकालीन सौम्य ते मध्यम स्वरूपाचा नैराश्य विकार असतो, त्यांना कधी-कधी Major Depressive Episode (गंभीर नैराश्याचा टप्पा) येतो. जेव्हा PDD असलेल्या व्यक्तीला MDD चा तीव्र झटका येतो, तेव्हा त्याला Double Depression असे म्हणतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT