Why we celebrate Maharashtra din on 1 May of each year Saam Tv
लाईफस्टाईल

Maharashtra Din 2024 Importance: जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Why We Celebrate Maharashtra Din on 1 May?: १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र हे राज्य शूर वीरांचे, संताचे, गडकिल्ल्यांचे आणि कवी-लेखकांनी समृद्ध अशा इतिहास रमलेले आहे.

कोमल दामुद्रे

१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र हे राज्य शूर वीरांचे, संताचे, गडकिल्ल्यांचे आणि कवी-लेखकांनी समृद्ध अशा इतिहास रमलेले आहे.

महाराष्ट्राचे वर्णन करताना कवी गोविंदाग्रज यांनी मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा। प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा॥ अशा सुंदर ओळी वापरल्या आहेत. तर कुसुमाग्रज म्हणतात, 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या द-याखो-यातील शिळा. विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र (Maharashtra).

अनेक ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमही साजरे केले जातात. पण १ मे या दिवशी महाराष्ट्र दिन का साजरा (Celebrate) केला जातो. याचे महत्त्व काय? यामागचे कारण काय? जाणून घेऊया.

१ मे ला महाराष्ट्र दिनासोबतच गुजरात दिनही साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भारतीय राज्यांची स्थापना झाली होती. भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा ही दोन्ही राज्ये बॉम्बे प्रदेशाचा भाग होती. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. मराठी आणि गुजराती भाषिकांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली होती. यावेळी आंदोलनही करण्यात आले होते.

१९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत अनेक राज्य निर्माण झाली. या कायद्यामध्ये कन्नड भाषिक लोकांसाठी कर्नाटक राज्याची निर्मिती, तर तेलुगू भाषिकांना आंध्र प्रदेश मिळाला. केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना मल्याळम आणि तामिळ भाषिकांसाठी निवडण्यात आले. परंतु, मराठी आणि गुजरातींसाठी स्वतंत्र असे राज्य नव्हते त्यामुळे आंदोलने करण्यात आली.

१ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

१ मे १९६० साली भारताचे तत्कालीन नेहरु सरकारने बॉम्बे पुनर्रचना कायदा १९६० अंतर्गत बॉम्बे प्रदेशचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात विभाजन केले. बॉम्बे बाबतही यात अनेक वाद होते.

मराठी भाषिकांना असे वाटायचे की, बॉम्बे त्यांना मिळायला हवे तर गुजराती लोकांना असे वाटते की, मुंबई ही त्यांच्यामुळेच आहे. कालांतराने मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT