Winter Skin Care Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा ड्राय का पडते? Soft Skin साठी या टिप्स फॉलो करा

Why Skin Become Dry In Winter : थंडीत त्वचा कोरडी का पडते? याचे नेमके कारण काय? त्वचा अधिक मुलायम होण्यासाठी काय कराल? त्याची काळजी कशी घ्याल? जाणून घेऊया सविस्तर

कोमल दामुद्रे

Soft Skin Care Tips :

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होतो. याचा परिणाम हा त्वचेवर पण दिसून येतो. यामुळे त्वचा अनेकदा कोरडी आणि निर्जीव होते. थंडीत त्वचेचे खूप जास्त प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी.

परंतु, थंडीत त्वचा कोरडी का पडते? याचे नेमके कारण काय? त्वचा अधिक मुलायम होण्यासाठी काय कराल? त्याची काळजी कशी घ्याल? जाणून घेऊया सविस्तर

1. त्वचेचा पोत

आपल्या त्वचेला (Skin) तीन थर असतात. त्यातील पहिला थर म्हणजे बाह्यत्वचा जी आपल्याला दिसते. दुसरा थर ज्याला डर्मिस म्हणतात आणि तिसरा थर जो शरीराच्या आत असतो. त्वचेच्या या थरांना आतून आणि बाहेरुन पुरेसे पोषण न मिळाल्यास त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे त्वचेची चमक कमी होऊ लागते.

2. कशी घ्याल काळजी?

त्वचा हायड्रेट न होणे

हिवाळ्यात (Winter Season) शरीराच्या आतून हायड्रेशनची कमतरता हे कोरड्या त्वचेचे सर्वात मोठे कारण आहे. अनेकदा हिवाळ्यात आपल्याला खूप कमी तहान लागते. कमी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहात नाही तर त्वचा देखील कोरडी पडते.

त्वचेमध्ये ओलावा नसणे

हिवाळ्यात त्वचेची नैसर्गिक आर्द्रता हिरावून घेतली जाते. त्यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ लागते. ती कोरडी झाल्यामुळे त्वचेला खाज सुटते.

3. हिवाळ्यात त्वचा सॉफ्ट कशी बनवाल?

  • हिवाळ्यात कोमट पाण्याने (Water) आंघोळ करा. चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा आणि बॉडी लोशनचा वापर करा. मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन वापरता, त्यात चांगले नैसर्गिक तेल, ग्लिसरीन आणि शिया बटर किंवा कोकोआ बटर असावे.

  • कच्च्या दुधात कॉफी पावडर आणि मीठ मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर, मालिश करा आणि कोमट पाण्याने धुवा.

  • हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या, संत्री, स्ट्रॉबेरी, करवंद, करवंद इत्यादी खा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT