New Born Baby Saam Tv
लाईफस्टाईल

New Baby Born : नवजात बाळाला ६ महिने पाणी का देऊ नये? जाणून घ्या, कारणे आणि योग्य वेळ

नवजात बालकांना पहिले ६ महिने वेगळे पाणी देण्याची गरज नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New Born Baby : घरात लहान पाहुणे येताच आजी-आजोबाच नाही तर घरातील प्रत्येक वृद्ध व्यक्ती आई-वडिलांना मुलाचे आरोग्य चांगले ठेवण्याचा सल्ला देऊ लागतात. पालकांना दिला जाणारा एक सल्ला म्हणजे त्यांच्या नवजात बाळाला ६ महिन्यांपूर्वी पाणी देऊ नका. पण तुम्हाला या सल्ल्यामागचे खरे कारण माहित आहे का आणि बाळाला (Baby) पाणी देण्याची योग्य वेळ कोणती आहे. अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया, ज्याबद्दल पालकांना (Parents) माहित असणे आवश्यक आहे.

बाळाला ६ महिन्यांनंतरच पाणी का दिले जाते?

नवजात बालकांना पहिले ६ महिने वेगळे पाणी देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या आईचे दूध पुरेसे आहे. कारण आईच्या दुधात ८० टक्के पाणी असते, ज्यामुळे तिला आवश्यक असलेले सर्व पोषण आणि हायड्रेशन मिळते. याशिवाय फॉर्म्युला दूध पिणाऱ्या बाळांचे शरीरही हायड्रेटेड राहते. यामुळेच कमीत कमी ६ महिन्यांनी बाळांना पाणी देण्याचा सल्ला दिला जातो. हे लक्षात ठेवा की पातळ फॉर्म्युला दूध पाजणे किंवा जास्त पाणी पिणे बाळाचे आरोग्य बिघडू शकते.

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

तज्ज्ञांच्या मते, बाळ जेव्हा घन पदार्थ खाण्यास सुरुवात करते, तेव्हाच पाणी पिण्यास सुरुवात करावी. यासाठी तुम्ही मुलांच्या हातात सिपर धरू शकता.

मुलाचे शरीर हायड्रेटेड आहे हे कसे कळेल -

जर बालक २४ तासांत ६ ते ८ वेळा लघवी करत असेल तर याचा अर्थ त्याला पुरेसे पाणी मिळत आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात पक्षप्रवेश

खासदार संजय पाटलांचा संयम सुटला! पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दिला दम, पोलिसांसमोरच हायव्होल्टेज ड्रामा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं 30000 रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

SCROLL FOR NEXT