red chilli health benefits google
लाईफस्टाईल

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Healthy Lifestyle : लाल मिरची फक्त तिखटपणासाठी नव्हे तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. वजन कमी करणे, पचन सुधारणा, हृदयाचे संरक्षण, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अशा अनेक फायद्यांमुळे ती औषधासारखी मानली जाते.

Sakshi Sunil Jadhav

  1. लाल मिरची वजन कमी करण्यात आणि पचनक्रिया सुधारण्यात मदत करते.

  2. हृदयविकाराचा धोका कमी करून रक्ताभिसरण सुधारते.

  3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तणाव कमी करते.

  4. स्नायू व सांधेदुखी कमी करण्यासाठी नैसर्गिक वेदनाशामक म्हणून उपयोगी ठरते.

भारतीय स्वयंपाकघर हे मसाल्यांशिवाय अपूर्ण मानले जाते. मिरचीचा समावेश महाराष्ट्रात प्रत्येक पदार्थात मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण मिरचीच्या मसाल्याशिवाय जेवण फिके वाटते. बरेच लोक मिरचीचा वापर फक्त तिखटपणा आणि चव वाढवण्यासाठी करतात. पण लाल मिरची आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे अनेकांना ठाऊक नसते.

लाल मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन हे घटक मिरचीच्या तिखटपणाचे कारण असले तरी त्यामुळे शरीराचे चयापचयाचा वेग वाढतो. त्याने कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. तुम्ही मिरचीचे सेवन मर्यादित प्रमाणात करत असाल तर वजन कमी करण्यासाठी ती उपयोगी ठरू शकते. लाल मिरची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तिचे सेवन लाळ व पाचक रसांचे उत्पादन वाढवते. ज्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून तुम्हाला आराम मिळू शकतो . एवढेच नव्हे तर मर्यादित सेवन रक्ताभिसरण सुधारण्यातही प्रभावी ठरते.

हृदयविकारापासून बचाव करण्यामध्ये देखील लाल मिरची उपयुक्त आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतात तर कॅप्सेसिन रक्ताच्या गाठी तयार होण्यापासून थांबवतात. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी लाल मिरचीची भूमिका महत्त्वाची ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लागणारे जीवनसत्व सी लाल मिरचीमध्ये मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. तसेच यातील अँटीऑक्सिडंट्स तणाव कमी करण्यात मदत करतात. वेदना कमी करण्यासाठी देखील लाल मिरची उपयुक्त आहे. कॅप्सेसिन हे नैसर्गिक वेदनाशामक मानले जाते, जे स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळवून देते. भारतीय स्वयंपाकात रोजच्या वापरातील लाल मिरची ही फक्त तिखटपणासाठी नसून शरीरासाठी औषधासारखीही आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT