Breastfeeding and periods SAAM TV
लाईफस्टाईल

No periods after delivery: डिलिव्हरीनंतर पीरियड्स नेमके कधी सुरू होतात? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Breastfeeding and periods: स्तनपान करताना पिरीयड्स न येणं हे अनेक महिलांसाठी सामान्य असतं. प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे ओव्ह्युलेशन थांबतं. मात्र काही परिस्थितीत गर्भधारणा होऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

आई झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. यामध्ये एक मोठा प्रश्न अनेकांना पडतो बाळाला स्तनपान देताना पीरियड्स का येत नाहीत? बाळ झाल्यानंतर अनेक महिलांना हा प्रश्न सतावत असतो. मात्र स्तनपान करताना पिरीयड्स न येणं हे सामान्य आहे का यावर तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिलीये.

एका वेबसाईटला माहिती देताना पुण्यातील पिंपरीच्या DPU सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागातील डॉ. शिल्पा पी. क्षीरसागर यांनी सांगितलं की, डिलिव्हरीनंतर आणि स्तनपानाच्या काळात महिलांना पीरियड्स न येणं पूर्णपणे सामान्य आहे. बाळाला स्तनपान देताना शरीरात प्रोलॅक्टिन नावाचं हार्मोन वाढतो. हा हार्मोन ओव्ह्युलेशन थांबवतो आणि त्यामुळे पीरियड्स येण्यास उशीर होतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या अवस्थेला लॅक्टेशनल अमेनोरिया असं म्हटलं जातं. म्हणजेच स्तनपानाच्या काळात पीरियड्स न येणं. विशेष म्हणजे जर बाळ ६ महिन्यांपेक्षा लहान असेल तर त्याला फक्त आईचं दूध दिलं जात असेल आणि डिलिव्हरीनंतर एकदाही पीरियड्स आले नसतील तर सुमारे ९८ टक्के महिलांमध्ये ओव्ह्युलेशन होत नाही. या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता खूप कमी असते.

डिलिव्हरीनंतर पीरियड्स नेमके कधी सुरू होतात?

डॉ. क्षीरसागर यांच्या मते, बाळाचा जन्म झाल्यानंतर आईला मासिक पाळी परत सुरू होण्याचा ठराविक वेळ नसतो. काही महिलांना डिलिव्हरीनंतर ६ आठवड्यांतच पीरियड्स सुरू होतात तर काहींना अनेक महिने ते येत नाहीत.

मात्र काही गोष्टी बदलल्या की ओव्ह्युलेशन पुन्हा सुरू होऊ शकतं. जसं की, बाळ ६ महिन्यांपेक्षा मोठं झालं, त्याला वरचं दूध सुरू केलं रात्रीचं स्तनपान कमी झालं किंवा एकदाही पीरियड्स आले तर शरीरात पुन्हा बदल होऊ लागतात. अशा वेळी पुढचे पीरियड्स येण्यापूर्वीही गर्भधारणा होऊ शकते.

डॉक्टरांचा सल्ला घेणं का महत्त्वाचं?

डिलिव्हरीनंतर ६ आठवड्यांनी गायनॅकोलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे, असं डॉक्टर सांगतात. योग्य गर्भनिरोधक उपाय सुरू केल्यास अनियमित पीरियड्स किंवा पीरियड्स न येण्याचा ताण कमी होतो. त्याचप्रमाणे स्तनपान चालू असताना पीरियड्स येत नसले तरी गर्भधारणा होणार नाही याची खात्री देता येत नाही.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT