pregnancy tips, do not drink preservatives juice, Health tips
pregnancy tips, do not drink preservatives juice, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

गरोदरपणात सिल बंद असलेल्या ज्यूसचे सेवन का करू नये ? जाणून घ्या त्यामागचे सत्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गर्भधारणा ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील खास टप्पा आहे. या काळात जन्माला येणाऱ्या बाळाची विशेष काळजी डॉक्टर आपल्याला घ्यायला लावतात.

हे देखील पहा -

या दिवसात आहाराची काळजी घेतली जाते. खाण्याचे प्रमाण कसे असायला हवे ? किती असायला हवे ? त्यासोबतच कोणता आहार योग्य आहे ? हे सर्व आपल्याला डॉक्टर समजावून सांगतात. बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. त्यात बहुतेक महिला या सिल बंद असलेले ज्यूसच्या पॅकेटची निवड करतात. त्यामुळे बाळाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. सिल बंद असलेले ज्यूस पॅकेट हे सर्वासाठी हानिकारक असते ते कसे हे जाणून घेऊया.

१. पौष्टिकतेची कमतरता भरून काढण्यासाठी गरोदर (Pregnant) महिला ज्यूस पितात. परंतु, पॅक केलेले ज्यूस हे उकळून बनवले जातात. त्यामुळे रसातील सर्व पोषक घटक नाहीसे होतात. त्यासाठी याचे सेवन करु नये.

२. ज्यूस दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यात प्रिझर्वेटिव्हज पदार्थांचा वापर केला जातो. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते. पॅकेज्ड ज्यूसचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण वाढते.

३. पॅकबंद ज्यूसमध्ये रंगांचा वापर केला जातो त्यामुळे त्याचे सेवन गरोदर असलेल्या महिलेने करु नये.

४. साखरेचा (Sugar) वापर पॅकबंद फळांचा रस बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. अशावेळी गरोदरपणात ज्यूसचे जास्त सेवन केल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो. तसेच, दररोज ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते.

५. या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास त्यात असणाऱ्या पारा आणि कॅडमियम या घटकांमुळे बाळाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

SCROLL FOR NEXT