लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपला लोगो बदला आहे. त्यांना वर्डमार्क आणि त्यावर असणारे इमोजी पुन्हा नव्याने डिझाइन केले आहेत. कंपनीचा नवा लोगो हा आधीसारखा दिसत असून त्याच्या रंगात बदल करण्यात आला आहे.
पूर्वी फेसबुकच्या मागचा रंग हा फिकट निळा होता तर आता तो गडद निळा करण्यात आला आहे. तसेच यामध्ये असणारे लोअरकेस अक्षर 'f' देखील बदलेले आहे. जाणून घेऊया फेसबुकचा नवा लोगो कसा आहे त्याबद्दल
1. नवीन लोगोमध्ये किती फरक
मेटाने आधीच आपल्या वेबसाइटवर (Website) लोगो बदलला आहे यामधील शब्दमार्क देखील फेसबुक सॅन्स फॉन्टमध्ये बदलला आहे. तसेच यामध्ये अपगेडदेखील प्राप्त केले आहेत. नवीन रंग हा थोड्या प्रमाणात गडद असून त्याची टायपोग्राफी बदलण्यात आली आहे.
कंपनीने म्हटले आहे की, फेसबुकने (Facebook) लोगो रिडिझाइन केला आहे. यामध्ये 'f' हे अक्षर गडद रंगात दिसायला हवे. लोगो बदलण्यामागे कंपनीने तीन कारणंही सांगितली आहे. यामध्ये ब्रॅण्डचा सर्वात महत्त्वाचा कंटेंट वाढवणे, Facebook ला ब्रॅण्ड म्हणून पाहाणे आणि त्या रंगाची विशिष्ट अशी ओळख बनवणे.
कंपनीने सांगितले की, सध्या २ अब्जाहून अधिक लोक फेसबुकचा वापर करत आहेत. यामध्ये कंपनीला त्याची स्वत:ची नवीन ओळख निर्माण करण्याची आणि जगभरातील वापरकर्त्यांसाठी हे प्लॅटफॉर्म अधिक सुलभ बनवण्यासाठी लोगो चेंज केला आहे.
2. लोगोमध्ये झाले हे बदल
मेटाने (Meta) फेसबुक लोगोमध्ये बदलेल्या प्रतिक्रिया आणि इमोजीच्या रंगांसह बदल केले आहेत. ज्यामुळे त्याला नवीन डिझाइन देण्यात आली आहे. यात असणारे नवीन इमोजी लवकरच काही महिन्यात रिलीज होतील. कंपनीने सांगितले की, फेसबुक सध्या अॅपच्या मोठ्या रिडीझाइनवर काम करत आहे. ज्यामध्ये लवकरच नवीन वैशिष्ट्ये सादर केली जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.