Heart attack increasing at a young age saam tv
लाईफस्टाईल

Cardiac arrest: का वाढतायत कमी वयात हार्ट अटॅकचं प्रमाण; जीवघेण्या समस्येचा धोका कसा कमी कराल?

Cardiac arrest: आजकाल अनेक आजार कमी वयात होऊ लागले आहेत. कमी वयात हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टला कसा प्रतिबंध करायाचा याबाबत तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिलीये.

Surabhi Jagdish

सध्याच्या तरूणांची जीवनशैली चुकीची असून यामुळे अनेक आजार कमी वयात होऊ लागले आहेत. यामधील एक समस्या म्हणजे, हृदयासंबंधिच्या समस्या. केवळ नसा ब्लॉक होणं नाही तर तरूणांमध्ये आता हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. कमी वयात हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टला कसा प्रतिबंध करायाचा याबाबत तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिलीये.

वाशीच्या फोर्टिस हीरानंदानी रूग्णायातील कंसल्‍टेन्‍ट इंटरवेंशनल कार्डियोलॉजीस्ट डॉ. प्रशांत पवार यांच्या सांगण्यानुसार, 20 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या प्रकणांचं मुख्य कारण म्हणजे अभ्यास आणि करिअरशी संबंधित ताण. आपलं आरोग्य जपण्यासाठी हृदयाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. या वयात तुमच्या प्राथमिक काळजी घेणाऱ्या डॉक्टरांच्या नियमित संपर्कात राहून आणि हृदयाचे आरोग्य लक्षात घेतलं पाहिजे. याचे तुम्हाला भविष्यात बरेच फायदे मिळू शकतात.

डॉ. प्रशांत पवार यांनी या वयातील मुलांनी त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबत माहिती दिली आहे. यावेळी खाली दिलेल्या मापदंडावर लक्ष ठेवा.

वाढलेलं कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी बहुतेक वेळा अनियमित आणि अयोग्य आहाराचा परिणाम असतो. यामुळे हृदयरोग किंवा पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.

उच्च रक्तदाब

चुकीच्या जीवनशैलीमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि उच्च रक्तदाबाचा त्रास वाढू शकतो.

लठ्ठपणा

लठ्ठ लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने अकाली मृत्यू होण्याची शक्यता असते, त्यामुळे सकस आहार घ्या आणि वजनाची काळजी घ्या.

कौटुंबिक इतिहास

तुमच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास जाणून घ्या. जसं की स्ट्रोक, रक्तदाब किंवा उच्च कोलेस्ट्रॉलचा इतिहास.

व्यायाम

दररोज 30 मिनिटे व्यायाम करा किंवा 10-10 मिनिटांचे तीन सेट करा. हे तुमचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फिटनेस सुधारेल.

धूम्रपान सोडा

धूम्रपान करणाऱ्यांना हृदयविकार होण्याची शक्यता दुप्पट किंवा चार पट असते.

न्यूबर्ग अजय शहा प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शहा म्हणाले, तरुण वयात हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी एक्टिव्ह जीवनशैलीचा अवलंब करणं आणि आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. मुख्य प्रतिबंधात्मक उपायांमध्ये फळं, भाज्या, धान्य यांचा आहारात समावेश करावा. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम करणं महत्वाचे आहे. धूम्रपान आणि जास्त मद्यपान टाळा. कारण दोन्ही हृदयाला नुकसान पोहोचवू शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.

रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणं महत्त्वाचं आहे, जे हृदयविकाराचा धोका दर्शवतात. कुटुंबात हृदयाशी संबंधित समस्यांचा इतिहास असल्यास, काही तपासण्या करणं आवश्यक आहे, असंही डॉ. शहा म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सदा सरवणकर यांच्यावर सुषमा अंधारे यांची टीका

Maharashtra Politics: अजितदादा वाघ होते पण त्यांची नखं भाजपने काढली, उत्तम जानकरांची बोचरी टीका

Pune Election : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत मॅनेजर होण्याची संधी; महिना ८७००० रुपये पगार, पात्रता काय? जाणून घ्या

Ice cream ला संस्कृतमध्ये काय म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT