Hanuman Janmotsav 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Hanuman Janmotsav 2023 : हनुमान जन्मोत्सव कधी आहे ? जाणून घ्या शुभ मुहूर्त व तिथी

Hanuman Jayanti Puja : चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

कोमल दामुद्रे

Hanuman Jayanti : अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान... हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

यावेळी 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, हनुमानाला भगवान शिवाचा (Shiva) रुद्रअवतार मानले जाते आणि त्यांचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी झाला. म्हणूनच मंगळवार हा बजरंगबलीला समर्पित मानला जातो आणि या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने त्याचा आशीर्वाद मिळतो.

1. हनुमान जयंती तिथी

पंचांगानुसार 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी (Celebrate) केली जाईल. चैत्र पौर्णिमा बुधवार, 5 एप्रिल रोजी सकाळी 9.19 वाजता सुरू होईल आणि ती गुरुवार, 6 एप्रिल रोजी 10.4 मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदय तिथीच्या मान्यतेनुसार 6 एप्रिललाच हनुमान जयंती साजरी केली जाईल आणि या दिवशी उपवास करून बजरंगबलीची पूजा केली जाईल.

2. शुभ मुहूर्त

6 एप्रिल रोजी सकाळी 6.06 ते 7.40 पर्यंत हनुमान जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर तुम्ही दुपारी १२:२४ ते १:५८ पर्यंत पूजा करू शकता. याशिवाय संध्याकाळी ५.३० ते ८.३० हा पूजेचा शुभ मुहूर्त आहे.

3. महत्व

हनुमान जयंतीच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी बजरंग बली पूजा करणाऱ्या व्यक्तीला सर्व रोग आणि दोषांपासून दूर ठेवतो आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून त्याचे रक्षण करतो. जीवनातील दु:ख दूर होऊन सुख-शांती प्राप्त होते. यासोबतच शनिदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासांपासून मुक्ती मिळते.

4. विधी

  • हनुमानजीची पूजा करण्यासाठी बजरंगबलीला लाल फुले, सिंदूर, अक्षत, सुपारी, मोतीचूर लाडू, लाल कापड आणि तुळशीची पाने अर्पण करा.

  • हनुमान चालिसा पाठ करा. पुन्हा हनुमानजीची आरती करावी.

  • हनुमानजींना भोग म्हणून लाडू, हलवा आणि केळी (Banana) अर्पण करा.

  • या दिवशी सुंदरकांड आणि बजरंगबाण पठण करण्याचेही विशेष महत्त्व मानले जाते.

  • असे केल्याने बजरंगबली प्रसन्न होतो आणि आपल्या सभोवतालच्या सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

SCROLL FOR NEXT