Hanuman Jayanti 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजा पद्धत

Hanuman Jayanti 2024 Tithi : २३ एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार हनुमानाला भगवान शिवाचा रुद्रअवतार मानला जातो.

कोमल दामुद्रे

Hanuman Jayanti 2024 Date :

भीमरुपी महारुद्रा व्रज हनुमान मारुती... हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

यंदा २३ एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा (Celebrate) केला जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार हनुमानाला भगवान शिवाचा रुद्रअवतार मानला जातो. त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी मंळवारी झाला. त्यामुळे मंगळवार हा दिवस हनुमाला (Hanuman) समर्पित आहे. यादिवशी उपवास आणि पूजा केल्याने आशीर्वाद मिळतो.

1. हनुमान जयंती तिथी

पंचागानुसार चैत्र पौर्णिमा २३ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ३.२५ मिनिटांनी सुरु होईल आणि २४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ५.१८ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार २३ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी उपवास करून बजरंगबलीची पूजा केली जाईल.

2. शुभ मुहूर्त

२३ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ३.२५ ते २४ एप्रिल ५.१५ पर्यंत हनुमान जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. या काळात दिवसभर शुभ मुहूर्त असतील.

3. महत्त्व

यंदा हनुमान जयंती मंगळवारी येत असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. याशिवाय यादिवशी चित्रा नक्षत्र असून त्याचा स्वामी मंगळ आहे. तसेच मंगळ मीन राशीत भ्रमण करणार आहे. हनुमानाची पूजा केल्याने आकस्मिक संकट, रोग, वेदना अशा अनेक समस्या दूर जातात.

4. विधी

  • हनुमानजीची पूजा करण्यासाठी लाल फुले, सिंदूर, अक्षता, सुपारी, मोतीचूर लाडू, लाल कापड आणि तुळशीची पाने अर्पण करा.

  • हनुमान चालिसाचे पठण करा तसेच हनुमानजीची आरती करावी.

  • हनुमानजींना भोग म्हणून लाडू, हलवा आणि केळी अर्पण करा.

  • या दिवशी सुंदरकांड आणि बजरंगबाण पठण करण्याचेही विशेष महत्त्व मानले जाते.

  • असे केल्याने बजरंगबली प्रसन्न होतो आणि आपल्या सभोवतालच्या सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT