why fatigue problem rise in young generation, causes of fatigue, how to deal with fatigue ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Fatigue Problem: तरुण पिढीत थकवा का वाढतो आहे ? त्याचे नेमके कारण काय ?

थकवा वाढण्याचे प्रमाण का वाढत आहे जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल दैनंदिन जीवन रोजच धावपळीच असत. दिवसभर काम, काम आणि फक्त काम त्यामुळे शरीराला विश्रांती न दिल्यामुळे सतत थकवा जाणवत असतो. याचा परिणाम फक्त आपल्या जीवनशैलीवर होत नाही तर आपल्या आरोग्यावर सुद्धा होतो.

हे देखील पहा -

सततचे काम आणि शरीराला मिळणारा ताण यामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक त्रास जाणवू लागतो. आपल्या शरीरातली ताकद कमी झाली की, आपल्या थकवा जाणवू लागतो. काम करण्यास उत्साह न वाटणे, थोडेसे परिश्रम केल्यानंतर दमणे तसेच सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हा थकवा का जाणवतो त्यावर विचार करून योग्य तो मार्ग काढायला हवा. शरीरासोबत कधी कधी मनही थकते त्यामुळे आपल्याला कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. थकवा का येतो व त्याचे वाढते प्रमाण नेमके काय हे जाणून घेऊया. (causes of fatigue)

१. विचित्र झोपेच्या सवयींमुळे आपली झोप पूर्ण होत नाही. झोपत सतत घोरणे, दम्याचा त्रास किंवा पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीराला व मेंदूला विश्रांती मिळत नाही त्यांमुळे आपल्याला सकाळी थकवा जाणवू शकते.

२. शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अॅनिमियाचा त्रास आपल्याला उद्भवू शकतो. पेशींना पुरेसा प्राणवायू न मिळाल्यामुळे आपल्याला सतत थकवा येत असतो.

३. सतत गोडाचे सेवन केल्याने आपल्या शरीरात साखरेचे (Sugar) प्रमाण वाढते. तसेच शरीरातील न वापरता येणारी साखर शरीरात थकवा निर्माण करते. त्यामुळे आपले शरीर हालचाल करत नाही त्यामुळे आपल्या शरीरात थकवा निर्माण होऊ शकतो.

४. चहा, कॉफी (Coffee) व कोल्ड ड्रिंकचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आपल्याला त्याचे दूष्परिणाम जाणवू लागतात. त्यामुळे झोप न येणे, छातीत सतत धडधडणे व अस्वस्थ वाटू लागते त्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवू लागतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT