Happy Father's Day
Happy Father's Day ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

फादर्स डे का साजरा केला जातो ? त्याची सुरुवात कधीपासून झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आईसारखेच वडिलदेखील घरातील महत्त्वाचा हिस्सा आहे. ज्यांच्या सावलीत आपलं संपूर्ण कुटुंब सुरक्षित असते.

हे देखील पहा-

फादर्स डे हा जगाच्या (World) अनेक भागात साजरा केला जातो. काही देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जाते. वडीलांचे त्याग, प्रेम व जबाबदारी याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली. हा दिवस कधी आणि का साजरा केला जातो हे जाणून घेऊया.

सुरुवात-

फादर्स (Father) डे हा दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा दिवस १९ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस वडिलांचे त्याग, प्रेम, जबाबदारी याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात वॉशिंग्टनमधील स्पोकेन शहरातून झाली. हा दिवस पहिल्यांदा येथे साजरा करण्यात आला. सोनेरा स्मार्ट डॉडद्वारे हा दिवस साजरा करण्यात आला. याची मूळ संकल्पना ही अमेरिकेतून आली आहे.

का साजरा करण्यात येतो-

सोनोराची आई लवकर मरण पावल्याने सोनरा व तिच्या भावडांची काळजी तिच्या वडिलांनी घेतली. आपल्या वडिलांचे प्रेम, त्याग व समर्पण पाहून सोनोराच्या मनात विचार आला की, आईसाठी जसा मातृदिवस साजरा केला जातो तसा वडिलांसाठी केला जावा यासाठी फादर्स डे साजरा करण्यात आला. त्यादिवसापासून जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. तसेच सोनोराच्या वडिलांचा वाढदिवस जूनमध्ये साजरा केला जात होता. त्यामुळे त्यांनी जूनमध्ये फादर्स डे साजरा करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली. अमेरिकेत सोनोराच्या या याचिकेसाठी सगळ्यांनी तिला प्रोत्साहन दिले व तिची मागणी पूर्ण झाली. १९ जून १९१० रोजी पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha: राज्यात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी मतदान

Lok Sabha Election : ४० वर्षांच्या महिलेच्या ओळखपत्रावर मतदान करण्यासाठी आली 8 वीतील मुलगी, बोगस मतदानाचा Video आला समोर

Live Breaking News: त्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा आरोप

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

SCROLL FOR NEXT