heart attack in sleep saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack: बिछान्यावर झोपताच खोकला येतोय अन् पाय सुजतायेत? असू शकतो हार्ट अटॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

Night Heart Symptoms: हार्ट अटॅकची लक्षणं अनेकदा झोपेत दिसतात. श्वास घेण्यास त्रास, खोकला, पाय सुजणे, थकवा ही गंभीर चिन्हं असून वेळेवर तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

हार्ट अटॅक हा आजच्या काळातला सर्वात मोठा आरोग्याचा धोका बनला आहे. चुकीची जीवनशैली, वाढता तणाव आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे हृदयविकारांचा धोका वेगाने वाढत चालला आहे. यामध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे हार्ट फेल्युअर. ही समस्या अचानक होत नाही, तर हळूहळू वाढत जाते. शरीर मात्र याची लक्षणं आधीपासूनच दाखवत असतं, विशेषतः रात्री झोपायला गेल्यानंतर ती अधिक स्पष्ट दिसतात.

रात्री झोपताना जर श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा सरळ झोप येत नसेल तर झोपताना सॉफ्ट उशीचा वापर करावा लागेल. तर हे फुफ्फुसांमध्ये पाणी साचल्याचं लक्षण असू शकतं. हे हार्ट फेल्युअरचं महत्त्वाचं चिन्ह मानलं जातं. झोपल्यावर जर वारंवार खोकला येत असेल किंवा शिटीसारखा आवाज येत असेल, तर हीदेखील धोक्याची घंटा आहे. अनेकदा ही तुम्हाला लक्षणं दमा असल्यासारखी वाटतात, पण प्रत्यक्षात ती हृदयविकाराशी संबंधित असतात.

बिछान्यावर झोपल्यानंतर पाय, गुडघे किंवा शरीराच्या खालच्या भागात सूज जाणवते. हे लक्षण देखील हृदय कमजोर झाल्याचे लक्षण असू शकते. शरीरात साचलेलं द्रव शिरांमध्ये परत जाऊ शकत नसल्यामुळे अशी सूज येते. याशिवाय, कारण नसताना वजन वाढणं, पोट किंवा पाय सुजणं, हेही शरीरात चरबी आणि द्रव साठत असल्याचं चिन्ह आहे आणि ते हार्ट फेल्युअरशी संबंधित असू शकतं.

रात्रभर नीट झोप न लागणं, सतत अंग बदलत राहणं, सकाळी उठल्यानंतरही थकवा जाणवणं, हीदेखील हृदय व्यवस्थित रक्तपुरवठा करू शकत नसल्याची चिन्हं आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असणाऱ्या लोकांमध्ये हार्ट फेल्युअरचा धोका अधिक असतो. त्यामुळे वेळेवर तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

या आजारापासून लांब राहण्यासाठी धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे टाळणं गरजेचं लागेल. तेलकट आणि फॅटी नसलेले, आहार कमी करणं, तणाव कमी करणं आणि पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. यासोबतच, दररोज किमान ३० मिनिटं चालणं, सायकलिंग करणं किंवा पोहणं यासारखा व्यायाम केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chikungunya: अरे बापरे! ५१ लाख भारतीयांना दरवर्षी चिकनगुनियाचा धोका; नेमका आजार आहे काय? जाणून घ्या लक्षणं

26/11 मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या NSG कमांडोला अटक, २०० किलो गांजासह ATS ने रंगेहाथ पकडले

Colon Cancer: सतत पोटदुखी अन् थकवा जाणवतोय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध

Mumbai To Tirupati Travel: मुंबई ते तिरुपती प्रवास कसा करावा? जाणून घ्या बस, रेल्वे, फ्लाइट आणि रोड ट्रिप माहिती

एका दिवसात किती प्रमाणात हळदीचं सेवन केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT