Heart disease among Indians saam tv
लाईफस्टाईल

Heart disease : भारतीयांमध्ये का वाढतंय हृदयाच्या आजारांचं प्रमाण? तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' एक प्रमुख कारण

Heart disease among Indians: नवीन संशोधनानुसार, भारतीयांना पाश्चिमात्य देशांतील लोकांपेक्षा हृदयविकाराचा धोका निर्माण होत असल्याचं दिसून आलं आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील 'वाईट' कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल कोलेस्ट्रॉलचा असंतुलित आणि वाढता स्तर.

Surabhi Jayashree Jagdish

भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसतंय. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही वाढतोय. या सगळ्यात सर्वाधिक धोकादायक ठरणारा आजार म्हणजे हृदयविकार. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, देशातील सुमारे ७.८ टक्के मृत्यू हे वाढलेल्या वाईट कोलेस्ट्रॉलमुळे होतात. आरोग्यसेवा आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात चांगली प्रगती झाली झाली, तरी हृदयविकार रोखण्यासाठी जनजागृती वाढवणं ही काळाची गरज आहे.

एलडीएल कोलेस्‍ट्रॉल धोकादायक ठरू शकते

भारतीयांमध्ये पाश्चिमात्य देशांच्या नागरिकांच्या तुलनेत सुमारे १० ते १५ वर्षे लवकर हृदयविकाराचा धोका निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे एलडीएल कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण. वाईट कोलेस्ट्रॉल हे 'सायलेंट किलर' म्हणून ओळखलं जातं. मुख्य म्हणजे याची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत.

एलडीएलसी हा कोलेस्ट्रॉलचा असा एक प्रकार आहे जो शरीरातील विविध भागांमध्ये चरबी पोहोचवण्यासाठी जबाबदार मानला जातो. ज्यावेळी याचं प्रमाण प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढतं, तेव्हा तो आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. त्यामुळेच त्याला 'वाईट कोलेस्ट्रॉल' असंही म्हटलं जातं. एलडीएलसीचं प्रमाण योग्य पातळीवर राखणं आवश्यक आहे.

वाईट कोलेस्ट्रॉलचं मॅनेजमेंट कसं कराल?

एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तरुण वयातच त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. कार्डियोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या मते, १८ व्या वर्षांपासून लिपिड प्रोफाइल चाचणी करणं फायदेशीर आहे. अशा लवकर तपासणीमुळे या समस्येचं वेळेत निदान करता येतं शक्य आहे.

मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमधील कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. झाकिया खान म्‍हणाल्‍या , "एलडीएल कोलेस्ट्रॉलचं मॅनेजमेंट करणं केवळ लक्ष्यित संख्या गाठण एवढेच नसतं. प्रत्येक व्यक्‍तीचे जोखमीचे घटक हे वेगळे असतात. ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा कौटुंबिक इतिहास, जीवनशैली निवडी, लठ्ठपणा यांसारख्या पूर्व-अस्तित्वातील स्थितींचा समावेश असतो. हे घटक कोलेस्ट्रॉलच्या उपचार पद्धतींवर प्रभाव पाडतात.

डॉ. खान पुढे म्हणाल्या की, नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या कालांतराने वाढू लागतात. या गोष्टी अनेकदा रूग्णाच्या लक्षात येत नाहीत. निर्धारित उपचार आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करणं तुमच्या फायद्याचं आहे. माझे १०-१५ टक्के रुग्ण त्यांच्या उपचारांचे काटेकोरपणे पालन करतात. कोलेस्ट्रॉल पातळीकडे दुर्लक्ष केल्याने अपरिवर्तनीय परिणाम होऊ शकतात.

भारतीयांना जास्त धोका आहे का?

वाईट कोलेस्ट्रॉलचा धोका भारतातील लोकांना नक्कीच जास्त आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये लहान, दाट एलडीएल कण असतात. मोठ्या एलडीएल कणांपेक्षा वेगळे हे लहान कण सहजपणे रक्‍तवाहिन्‍यांच्‍या भित्तिकेमध्‍ये प्रवेश करू शकतात. या माध्यमातून ते ऑक्सिडेशनमधून जातात आणि सूज निर्माण करतात. यामुळे फॅट्स जमा होण्याची शक्यता वाढते. परिणामी हृदयासंबधित आजारांचा धोका, स्ट्रोक आणि हार्ट फेलुअरचा धोका वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT