Heart attack young age saam tv
लाईफस्टाईल

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Reasons for heart attacks in youth: या वाढत्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये नियमित व्यायाम, संतुलित आणि पौष्टिक आहार, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन, धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणे आणि नियमित आरोग्य तपासणी यांचा समावेश आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पूर्वीच्या काळी हार्ट अटॅक म्हटलं की तो फक्त वयोवृद्ध व्यक्तींना येतो, असा आपला समज व्हायचा. मात्र आता हे चित्र पूर्णपणे बिघडलं आहे. अलीकडच्या काळात तरुण वयोगटातील हृदयविकाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसतेय. अनेकजण वयाने तरुण असूनही हृदयविकाराचा झटका येऊन आपला जीव गमावतात.

आधुनिक जीवनशैली बिघडतंय हृदयाचं आरोग्य

गुरुग्राममधील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्डिओलॉजीचे प्रमुख संचालक डॉ. मनजिंदर सिंग संधू यांनी सांगितलं की, आजचा तरुण वर्ग कामाच्या किंवा अभ्यासाच्या ओझ्याखाली दडलेला आहे. सतत कॉम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसून राहणं, फिरायला किंवा शारीरिक हालचाल करायला वेळ न मिळणं ही आता एक सामान्य बाब झाली आहे. यासोबत बाजारात मिळणारं जंक फूड, फास्ट फूड, शिळं-तेलकट खाणं, साखर आणि मीठ जास्त असलेले पदार्थ यामुळे शरीरावर ताण वाढतो आणि हृदयावरही परिणाम होतो.

लठ्ठपणाही हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा कमी वयात तरुणांमध्ये दिसू लागलाय. यामध्ये एकदा वजन वाढायला सुरुवात झाली की, त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबेटीस, कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या निर्माण होतात. या सगळ्या गोष्टी थेट हृदयावर परिणाम होतो. एवढंच नाही तर आजकालच्या आहारात हृदयासाठी उपयुक्त असणारे पोषणतत्त्वंही कमीच असतात.

मानसिक ताण आणि हृदयविकार

आजच्या तरुण पिढीसमोर मानसिक आरोग्याचाही मोठा प्रश्न आहे. सततचा ताण, चिंता किंवा नैराश्य या गोष्टी फक्त मनापुरत्याच नाहीत, तर त्या शरीरावरही परिणाम करत असतात. तणावामुळे शरीरात ‘कॉर्टिसॉल’ नावाचं स्ट्रेस हार्मोन वाढतं, जे रक्तदाब वाढवू शकतं. अशा तणावग्रस्त अवस्थेत अनेक जण धूम्रपान, दारू किंवा व्हेपिंगसारख्या वाईट सवयी जोपासतात.

जनुकीय कारणांचीही भूमिका महत्त्वाची

काही लोकांना लहान वयातच हार्ट अटॅक येण्यामागे त्यांच्या जनुकांचाही समावेश असू शकतो. ‘फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलिमिया’ नावाची स्थिती काहींमध्ये अनुवंशिक स्वरूपात असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लहान वयातच खूप वाढतो. ही गोष्ट वेळेत ओळखली गेली तर नियंत्रणात येऊ शकते, पण अनेक वेळा ती लक्षातच येत नाही.

वेळेत तपासण्या करून घ्या

तरुण वयात आजारी पडण्याची शक्यता कमी असल्यामुळे बरेच लोक आरोग्याच्या टेस्ट करून घेत नाही. पण हेच दुर्लक्ष गंभीर समस्या निर्माण करू शकतं. दरवर्षी एकदातरी ‘हार्ट चेकअप’, बीपी, ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल यांची तपासणी केली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT