Winter weight gain saam tv
लाईफस्टाईल

Winter weight gain: थंडी सुरु होण्यापूर्वी अचानक का होते वजनात वाढ? डॉक्टरांनी सांगितलं वजन घटवण्याच्या सोप्या टीप्स

हिवाळ्यात खाण्याच्या सवयी बदलणे, व्यायाम कमी होणे आणि झोपेच्या वेळेत बदल यांमुळे वजन वाढू शकते. थंडीच्या दिवसांत वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि चांगली झोप का महत्त्वाची आहे, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

हिवाळा सुरू झाला की अनेकांच्या वजनात वाढ होऊ लागते. कदाचित ही समस्या तुम्हाालाही जाणवत असेल. थंडीच्या दिवसांत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यातच बाहेर फिरायला जाणं आणि व्यायाम करणंही कमी होतं. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. पण हिवाळ्यात नेमकं वजन का वाढतं आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवं? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

हिवाळ्यात वजन वाढण्यामागे काय कारणं आहेत?

खाण्याच्या सवयी बदलतात

थंडीच्या दिवसांत गरमागरम आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतं. तळलेले पदार्थ, मिठाई आणि गोड पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे शरीरात गरजेपेक्षा जास्त कॅलरी जाऊ शकतात. या कॅलरी खर्च झाल्या नाहीत तर शरीरात चरबी साचू लागते आणि वजन वाढू शकतं.

चालणं आणि व्यायाम कमी होतो

थंडीमुळे अनेकांना सकाळी लवकर उठून फिरायला जाण्याचा कंटाळा येतो. बाहेर जाण्याऐवजी घरातच बसून राहण्याकडे कल वाढतो. त्यामुळे शरीराची हालचाल कमी होते आणि खाण्यातून मिळणाऱ्या कॅलरी खर्च न झाल्यास वजन वाढू शकतं.

झोपेचं चक्र बदलण्याची शक्यता

हिवाळ्यात दिवस लहान असतो आणि सूर्यप्रकाशही कमी मिळतो. याचा परिणाम काही लोकांच्या झोपेवर आणि रोजच्या दिनक्रमावर होऊ शकतो. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा बदलल्यामुळे खाण्याच्या सवयींमध्येही बदल होऊ शकतो.

केवळ थंडीमुळे वजन वाढत नाही

थंडी सुरू झाली की शरीरातील चयापचयाची प्रक्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावतो आणि त्यामुळे वजन वाढतं असं अनेकांना वाटतं. मात्र केवळ थंडीमुळे मेटाबॉलिझम मंदावणं हे वजन वाढण्यामागचं मुख्य कारण नाही. आहारातून मिळणाऱ्या कॅलरी आणि शरीराकडून खर्च होणाऱ्या कॅलरी यांच्यात असंतुलन निर्माण होणं हे वजन वाढण्यामागील महत्त्वाचं कारण आहे.

हिवाळ्यात वजन नियंत्रणात कसं ठेवायचं?

आहारात या पदार्थांचा समावेश करा

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. सिझनुसार, मिळणाऱ्या भाज्या, फळं, डाळी, संपूर्ण धान्य आणि प्रोटीन असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. त्याचबरोबर तळलेले पदार्थ, मिठाई आणि जास्त साखर असलेली पेयं कमी प्रमाणात घ्या.

पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करू नका

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात तहान कमी लागते. त्यामुळे अनेक जण पुरेसं पाणी पीत नाहीत. मात्र थंडीच्या दिवसांतही शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. त्यामुळे तहान कमी लागली तरी दिवसभर नियमितपणे पाणी पिण्याची सवय ठेवा.

रोज थोडा वेळ व्यायाम करा

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराची हालचाल सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे. हवामानानुसार सकाळी किंवा दुपारी चालायला जा. बाहेर जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी व्यायाम करा. त्याचप्रमाणे बराच वेळ एकाच जागी बसून राहणं टाळा.

वजन वाढल्यास आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

वजन जास्त वाढल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वजन वाढण्याकडे केवळ थंडीचा परिणाम म्हणून पाहू नका. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आघाडीवर असलेले भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे मतमोजणी केंद्रावर दाखल

Pradeep Purnekar Case: ठाण्यात तणावाचे वातावरण, पूर्णेकरांच्या समर्थकांकडून पोलिसांवर दगडफेक; VIDEO व्हायरल

Fruits for Health: या ३ फळांमध्ये लपलेलं आहे निरोगी आयुष्याचे गुपित; आजच तुमच्या डाएटमध्ये करा समावेश

Election Result : विधान परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! वाराणसी शिक्षक मतदारसंघातून सपाचा विजय

Thin Body Fat : शरीर बारीक पण पोट सुटलेले? सावधान! यामागे असू शकतात 'ही' ५ गंभीर कारणे

SCROLL FOR NEXT