Summer Weakness saam tv
लाईफस्टाईल

Summer Weakness: मेहनत न करताही उन्हाळ्यात का येतो अशक्तपणा? जाणून घ्या तुम्हाला येणाऱ्या थकव्याचं कारण

Summer Fatigue: उन्हाळ्यात अचानक थकवा, अशक्तपणा आणि चक्कर का येते? डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता, कमी रक्तातील साखर आणि उष्णतेचा शरीरावर होणारा परिणाम याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारतातील उन्हाळा केवळ कडक ऊनच नाही, तर प्रचंड आर्द्रताही घेऊन येतो. या ऋतूत आपल्याला केवळ भरपूर घामच येत नाही, तर आतून अत्यंत थकवा आणि अशक्तपणाही जाणवतो.

यामध्ये अनेकदा आपल्याला कोणतंही शारीरिक श्रम न करताही सुस्ती आणि चक्कर आल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यात शरीरात हा अचानक अशक्तपणा का येतो याबाबत तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिलीये.

डिहाइड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्स कमतरता

उन्हाळ्यात अशक्तपणा येण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन). शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी आपल्याला घाम येतो. घामामुळे केवळ पाणीच नाही तर सोडियम आणि पोटॅशियमसारखी आवश्यक खनिजंही निघून जातात. यांच्या कमतरतेमुळे रक्ताभिसरण मंदावतं ज्यामुळे थकवा आणि चक्कर येऊ लागते.

शारीरिक मेहनत

बाहेरील तापमान वाढल्यावर, शरीराचं अंतर्गत तापमान सामान्य राखण्यासाठी आपल्या शरीराला अधिक मेहनत करावी लागते. त्वचेच्या पृष्ठभागावर रक्त पोहोचवण्यासाठी आणि घामाद्वारे त्वचा थंड करण्यासाठी हृदयाला अधिक वेगाने रक्त पंप करावं लागतं. ही अतिरिक्त ऊर्जा वापरामुळे आपल्याला लवकर थकवा जाणवतो.

खाण्या-पिण्यात बदल होणं

उष्णतेमुळे अनेकदा भूक मंदावते. लोक हेवी जेवणाऐवजी केवळ द्रव पदार्थांवर अवलंबून राहतात किंवा जेवण टाळू शकतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे अचानक अशक्तपणा येऊ शकतो .

काही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या

ज्या लोकांना आधीपासूनच मधुमेह, ॲनिमिया, कमी रक्तदाब किंवा थायरॉईडच्या समस्यांसारखे आजार आहेत. त्यांच्यावर उष्णतेचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. उन्हात जास्त वेळ घालवल्याने त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Service Closed : प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कधी मिळतील? तारखेबाबत आली नवी अपडेट

Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव फायनल, पण अटीमुळं निर्माण झाली अडचण?

Maharashtra News Live Update: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान

Jio Recharge: एकदाच रिचार्ज करा आणि 336 दिवस निर्धास्त! Jio चा भन्नाट प्लॅन

SCROLL FOR NEXT