Relationship Tips
Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : बायको नवऱ्याशी का खोट बोलते ? जाणून घ्या कारण

कोमल दामुद्रे

Relationship Tips : नवरा बायकोच्या नात्यात कोणताही आडपडदा नसतो. आपण आपल्या पार्टनर सोबत कोणतीही गोष्ट बोलायला घाबरत नाही किंवा कोणतीही गोष्ट आपण अगदी मनमोकळेपणाने बोलतो. अशातच लग्न झालेले जोडपे एकमेकांवर जास्त विश्वास ठेवतात.

एवढेच नाही तर कपल्सला एकमेकांपासून काहीही न लपवण्याचा सल्ला देखील दिला जातो. त्या दोन व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारच्या फॉरमॅलिटीची गरज नसते. त्यामुळे ते दोघे एकमेकांना काहीही सांगू शकतात.

परंतु सगळेच कपल्स एक सारखे नसतात. अनेक जोडपे एकमेकांपासून एकमेकांच्या अनेक गोष्टी लपवतात. जर बायकोची (Wife) गोष्ट असेल तर, तिचे गोष्टी लपवण्यामागे काही कारणे असू शकतात. असा एखादा नाईलाज असतो की, ज्यामुळे पत्नीला तिच्या पतीपासून गोष्टी लपवायला लागतात. चला तर आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

1. योग्य पद्धतीने समजून न घेणे :

बायकोने नवऱ्यापासून गोष्टी लपवण्याचे हे एक मोठे कारण असू शकते. खरंतर पुरुष आणि महिलांचा (Women) स्वभाव अतिशय वेगळा असतो. जिथे महिला जास्त प्रमाणात इमोशनल होऊन सिच्युएशन पाहते. तिथे पुरुष जास्त प्रमाणात प्रॅक्टिकल असतात. हेच कारण आहे जेणेकरून अंडरस्टँडिंग लेवल बनत नाही. अशावेळी बायकोला असे वाटते की, आपण आपल्या नवऱ्याला या गोष्टी सांगितल्या की तो आपल्याला ओरडेल किंवा आपली मस्करी करेल. अशावेळी पत्नी काही गोष्टी नवऱ्याला सांगत नाही. ती त्या स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवते.

2. सर्व नात्यांमध्ये संतुलन ठेवण्यासाठी :

जेव्हा एक मुलगी लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा ती फक्त एक बायको म्हणून नाही तर, सून, ताई, वहिनी, काकी, मामी अशा प्रकारच्या अनेक नात्यांनी जोडली जाते. तिला तिच्या जुन्या आणि नवीन परिवारासह पुढे जायचे असते. या कारणामुळे ती आपल्या पतीला अनेक गोष्टी सांगत नाही. अशातच तिच्या सासरच्या लोकांनी तिला काही अपशब्द बोलले तरीसुद्धा ती तिच्या नवऱ्याला शेअर करत नाही. याच कारण म्हणजे घरामध्ये भांडण आणि क्लेश होऊ नये असं तिला वाटत असतं. भारतातील (India) समाजामध्ये असे मानले जाते की, एका स्त्रीने संपूर्ण घर सांभाळायचे असते. मग ती बाहेर ऑफिसला जाणारी असो किंवा नसो. अनेक बायका आपल्या नवऱ्यासोबत पैशांच्या गोष्टींबद्दल खोटं बोलतात. त्या महिला नवऱ्यापासून लपवून पैशांची जमवाजमव करतात. त्यांना थोडी फायनान्शिअल इंडिपेंडेंसी मिळावी म्हणून त्या अशा गोष्टी करत असतात. त्याचबरोबर कोणताही फायनान्शिअल प्रॉब्लेम झाल्यानंतर त्या त्यांच्या परिवाराला मदत करतात.

3. नवऱ्याच्या स्वभावामुळे :

प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. अशातच अनेक वेळा पत्नी तिच्या पतीच्या स्वभावामुळे सुद्धा त्याच्यासोबत खोटं बोलते. जर नवऱ्याचा स्वभाव जास्त खर्चाचा असेल तर, पत्नी त्याच्यासोबत खोटं बोलते. सोबतच ज्या महिलांचा पती जास्त रागिष्ट असेल तर, त्या सुद्धा भीतीमुळे कोणतीही गोष्ट त्यांच्या पतीला सांगण्यास घाबरतात. पत्नी बोलण्याआधी दहा वेळा विचार करते की, आपण बोललेल्या गोष्टीवर आपला पती कशा पद्धतीने रिऍक्ट करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT