Mumbling in High Fever saam tv
लाईफस्टाईल

High Fever : जास्त ताप आल्यावर व्यक्ती का बडबडू लागते? पाहा तापाचा डोक्यावर कसा होतो परिणाम?

Mumbling in High Fever : जास्त ताप आल्यानंतर लोकं का बडबडू लागतात याचा विचार तु्म्ही कधी केलाय का? असं का घडतं, याचा नेमका काय परिणाम होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

जास्त ताप आला की अनेकदा लोकं बडबडू लागतात. कदाचित तुम्हीही याबाबत ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. यामध्ये लोकं अनेकदा विचित्र गोष्टी बडबडतात. मुख्य म्हणजे या परिस्थितीत रूग्णांचे डोळे उघडे असतात मात्र त्याला काहीही कळत नाही. अशावेळी कुटुंबियांची हालत वाईट होते. नेमकं काय करावं हे घरच्यांना कळत नाही.

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का असं का घडतं? तापामध्ये आपल्या डोक्यावर त्याचा परिणाम का होतो? चला तर मग आज जाणून घेऊया की तापामध्ये आपल्या डोक्यावर नेमका काय परिणाम होतो. ही तापामध्ये बडबडणाऱ्या 'फीवर मिस्ट्री'मागे शास्त्रीय कारण काय आहे ते.

तापामुळे शरीराचं तापमान वाढतं

ज्यावेळी शरीरामध्ये इन्फेक्शनचा शिरकाव होतो जसं की, वायरल, बॅक्टेरियल इन्फेक्शन तेव्हा आपलं इम्युन सिस्टीम एक्टिव्ह होतं. यामुळे आपल्या शरीराचं नॉर्मल तापमान (98.6°F) यापेक्षा वाढून 102°F, 103°F पर्यंत जातं. जसं तापमान वाढतं तसं केवळ शरीरच नाही तर डोकं देखील ओव्हरहीट होऊ लागतं. जेव्हा हे तापमान मेंदूपर्यंत पोहोचतं तेव्हा त्याठिकाणची केमिस्ट्री डिस्टर्ब होऊ लागते.

नूरॉन्स जे विचार करण्याचं आणि समजण्याचं काम करतात त्यांच्यामध्ये अडचणी येऊ लागतात. परिणामी याचमुळे व्यक्ती विचित्र गोष्टी बोलू लागतात. अशावेळी समोरच्याला या गोष्टी ऐकून भीती वाटते किंवा हसूही येतं. याला डिलीरियम म्हटलं जातं. ज्यामध्ये व्यक्तीला भ्रम होऊ लागतो आणि तो खरं आणि खोटं यामध्ये फरक करू शकत नाही. काही प्रकरणांमध्ये लोकं स्वतःचं नाव देखील विसरून जातात आणि जोर-जोरात बोलू लागतात.

जास्त तापाचा डोक्यावर कसा परिणाम होतो?

  • तीव्र प्रमाणातील तापाने न्यूरोमीटर्समध्ये चेंजेस होतात. यामुळे विचार करण्याची क्षमता काही दिवसानंतर बदलू लागते.

  • काही लोकांना जास्त तापामध्ये असं वाटू लागतं की, ते जे पाहतायत किंवा ऐकतायत त्या गोष्टी खऱ्या आयुष्यात नाहीत.

  • तापामध्ये शरीराला थकवा येतो. यामध्ये औषधांचा परिणाम होतो आणि मेंदू अर्धा झोपेत आणि अर्धा जागा असतो. यामुळे लोकं काहीही बडबडू लागतात.

जास्त तापात कोणत्या समस्या सतावतात?

  • स्वतःशीच बोलणं

  • जुनी गोष्ट सतत सांगणं

  • कोणा व्यक्तीला आवाज देणं

  • भीती वाटणं किंवा ओरडणं

  • उपस्थित नसलेली गोष्ट दिसण्याचा दावा करणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT