रात्री झोपेत असताना अनेकांना गाढ झोपेत असताना जाग येते. जाग आल्यानंतर हात सुन्न पडल्यासारखा वाटतो. यावेळी हातात मुंग्या येतात आणि तो बधिर झाल्यासारखं अनेकांना जाणवतं. ही बाब सामन्यपणे अनेकांना जाणवते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जवळपास प्रत्येक तिसऱ्या प्रौढ व्यक्तीला आठवड्यातून किमान एकदा तरी झोपेत हात, मनगट सुन्न होण्याचा त्रास जाणवतो.
मेडिकल टर्ममध्ये या परिस्थितीला नॉक्टर्नल पॅरेस्थेशिया असं म्हटलं जातं. अनेकदा ही समस्या गंभीर नसते. मात्र जर ही समस्या तुम्हाला वारंवार जाणवत असेल तर डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. याची कारणं काय आहेत ती जाणून घेऊया.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, झोपेत हात सुन्न होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे नर्व्हवर येणारा दाब. झोपताना एखाद्या तुमच्या एखाद्या नसेवर दाब आला तर आणि त्या भागातील रक्तप्रवाह तात्पुरता कमी झाला टोचल्यासारखं जाणवतं.
झोपण्याच्या पोझिशनचाही यावर परिणाम होतो. यावेळी काही सवयी या नकळतपणे तुमच्या नर्व्हवर दाब आणतात. जसं की, मनगट वाकवून झोपणं, हात डोक्याखाली ठेवणं किंवा संपूर्ण शरीराचा भार हातावर येईल अशा पद्धतीने झोपणं. या सगळ्या गोष्टी हात सुन्न होण्याला कारणीभूत ठरतात.
जरी चुकीच्या झोपण्याची पद्धत हे मुख्य कारण असलं तरी काही वेळा ही समस्या इतर आजारांचे संकेत देऊ शकते. पेरिफेरल न्यूरोपॅथी नावाच्या स्थितीत तुमच्या शरीरातील नसा व्यवस्थित काम करत नाहीत. अशावेळी हात-पाय सुन्न होणं, मुंग्या येणं किंवा जळजळ होणं असा त्रास जाणवू शकते.
जर झोपेतून उठल्यानंतर हात सुन्न वाटत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. काही साध्या उपायांनी ही समस्या तुम्ही दूर करू शकता. यामध्ये तुम्ही झोपण्याची पोझिशन बदलणं, हात आणि बोटं हलके हलवणं, स्ट्रेचिंग करणं किंवा हात हलवून सैल करणं यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.
जर तुमचे हात कधीतरीच सुन्न होत असतील तर ते गंभीर नाही. मात्र हा त्रास वारंवार होत असेल किंवा बराच वेळ टिकत असेल किंवा त्यासोबत वेदना, अशक्तपणा किंवा इतर वेगळी लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.