Power Nap Importance Saam Tv
लाईफस्टाईल

Power Nap Importance : दुपारी जेवल्यानंतर 15 मिनिटं झोपण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे! वाचा सविस्तर

15 Mins Power Nap For Health : जेवणानंतर लोकांना अनेकदा झोप येऊ लागते. हे खरंतर शरीरात फील गुड हार्मोन्स वाढल्यामुळे असू शकते.

Shraddha Thik

Power Nap After Lunch :

जेवणानंतर लोकांना अनेकदा झोप येऊ लागते. हे खरंतर शरीरात फील गुड हार्मोन्स वाढल्यामुळे असू शकते. असे होते की जेव्हा तुम्ही अन्नाचे सेवन करता तेव्हा शरीरात सेरोटोनिन हार्मोन वाढतो, ज्यामुळे तुम्हाला सुस्ती येते आणि आळशी झाल्यासारखे वाटते.

पण, काही लोकांना या काळातही झोप येत नाही. अशा स्थितीत, आपल्याला एक लहान डुलकी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला फक्त 15 मिनिटे झोपायचे आहे. कारण जाणून घ्या याचे आहेत आरोग्याला फायदे (Benefits).

बीपी नियंत्रणात राहते

दुपारच्या जेवणानंतर 15 मिनिटे झोपणे (Sleep) फार महत्वाचे आहे. कारण ते बीपी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. हे प्रत्यक्षात व्यायामादरम्यान जलद हृदयाचे ठोक्यांना आराम देते. हे हृदय आणि मन शांत राहण्याची उत्तम क्रिया आहे. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि बीपी नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. अशा प्रकारे ते बीपीच्या आजारापासून तुमचे रक्षण करते.

तणाव कमी होतो

दुपारच्या जेवणानंतर झोपल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे सकाळी सुरू होणारा तणाव कमी होतो आणि मेंदूला शांत होण्याची संधी मिळते. यामुळे तुमचे शरीर ताजेतवाणे राहते आणि तणाव कमी होतो. बर्‍याच वेळा ही झोप रागावर (Anger) नियंत्रण ठेवते. ऑफिस आणि कामाच्या थकव्यामध्ये शांतता आणते.

प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी उपयुक्त

15 मिनिटांच्या झोपेमुळे प्रोडक्टिव्हिटी वेगाने वाढण्यास मदत होते. यामुळे तुमचा मेंदू रीस्टार्ट होतो आणि तुम्हाला बरे वाटते. या झोपेनंतर, तुम्ही अधिक ताजेपणाने होऊन काम करू शकता आणि आनंदी राहता. याशिवाय, झोप शरीरातील हार्मोनल विकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि याच्या मदतीने तुम्ही हार्मोनल समस्या टाळू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT