Relationship Tips  
लाईफस्टाईल

Relationship: जोडीदार का फसवतात? 'या' 3 कारणांमुळे नात्यात निर्माण होतो दुरावा

Relationship : फसवणूक केल्यामुळे नाते तुटत असते. या फसवणुकीमुळे ब्रेकअप आणि घटस्फोट होतात. दरम्यान जोडपे एकमेकांना का फसवतात? याची माहिती जाणून घेऊ..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Relationship Tips Cause of Cheating In Relationship: नातं तुटण्यासाठी फसवणूक एक महत्त्वाचं कारण ठरत असतं. जोडीदाराकडून फसवणूक झाल्यानंतर अनेकजण नैराश्यात जात असतात. तसेच ते स्वतःला वारंवार एकच प्रश्न करतात तो म्हणजे जोडीदाराने त्यांना का फसवलं? जोडीदार का फसवणूक करतात. बराच काळ नात्यात राहिल्यानंतर अनेकजण ब्रेकअप करतात. नातं तुटण्यामागे कारण काय हे जाणून घेऊ.

खोटं बोलणं

नात्याला घट्ट बनवण्यासाठी संवाद महत्त्वाचा घटक असतो. काही नात्यांमध्ये संवाद होणं कमी होतं आणि ते एकमेकांशी खोटं बोलू लागतात. ज्यावेळी समोरील व्यक्ती खोटं बोलू लागते, त्यापासून आपण सावध व्हावे. समोरील व्यक्ती आपली फसवणूक करतोय का याचा अंदाज घ्यावा.

भावना समजून न घेणं

नात्यात असताना दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या भावना समजून घेत असतात. मुळात नात्याची सुरुवात या गोष्टीपासून होत असते. समोरील व्यक्ती आपल्या भावना समजून घेते असं जेव्हा वाटतं तेव्हा नातं फुलत असतं. परंतु ज्यावेळी आपला जोडीदार भावना समजून घेत नसल्याचं जाणवत असेल तर समजून घ्या तुमचा जोडीदार हा तुमच्यापासून दूर जात आहे.

समजूतदारपणा

ज्यावेळी आपल्या नात्यात आलबेल नसेल तर एकमेकांमधील समजदारीत अभाव जाणवत असतो. जेव्हा एकमेकांना समजून घेत नसाल तर नात्यात दुरावा निर्माण होतो. दुरावा निर्माण झाल्यानंतर जोडीदार एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीत. जेव्हा समोरील व्यक्ती तुम्हाला समजून घेत नसेल तर तो व्यक्ती तुम्हाला फसवू शकतो. त्यामुळे नात्यात असताना एकमेकांना समजणं आवश्यक असतं. ही सर्व कारणे समजून घेऊन नात्यातील फसवणूक टाळण्यासाठी संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि संवादाला महत्त्व दिले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT