Causes of Tingling in Hands and Feet  
लाईफस्टाईल

हात-पायांना मुंग्या का येतात? यामागचं कारण काय?

Causes of Tingling in Hands and Feet : हाता- पायांना मुंग्या येण्यामागचे नेमके कारण काय आहे. ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Manasvi Choudhary

अनेकदा आपण बराच वेळ एकाच स्थितीत बसलो किंवा झोपलो तर हात किंवा पाय सुन्न होतात किंवा मुंग्या येतात. ही स्थिती काही सेकंदांत किंवा मिनिटांत स्वतःहून बरी होते. परंतु, जर तुम्हाला हाता-पायांना वारंवार मुंग्या येत असतील, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही शरीरात संकेत देत असल्याचे लक्षण असू शकते त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

हाता-पायांना मुंग्या येण्यामागची कारणे कोणती आहे. कोणत्या आरोग्याच्या समस्यामुळे हाता- पायांना मुंग्या येतात ते सविस्तरपणे समजून घ्या.

डायबिटीज

रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असणे हे हाता-पायांना मुंग्या येण्याचे मोठे लक्षण मानले जाते. डायबिटीजमुळे शरीरातील मज्जातंतूंचे नुकसान होते, ज्याला 'डायबेटिक न्यूरोपॅथी' म्हणतात. यामुळे हात आणि पायांमध्ये सतत सुन्नपणा आणि मुंग्या येण्याचा त्रास होतो.

व्हिटॅमिन्स कमतरता

विशेषतः व्हिटॅमिन बी-१२ आणि बी-कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे मज्जातंतूंचे आरोग्य बिघडते. चुकीचा आहार, अपुरी जीवनसत्त्वे यामुळे केवळ अशक्तपणा येत नाही, तर नसांचे कार्य मंदावून मुंग्या येण्याची समस्या निर्माण होते.

शारीरिक दुखापत आणि नसांवर दाब

पाठीला, मानेला, हाताला किंवा पायाला कधी लागलेली दुखापत, फ्रॅक्चर किंवा स्लिप डिस्कमुळे नसांवर (Nerves) तीव्र दाब येऊ शकतो. या दाबामुळे मज्जातंतूंची हालचाल बाधित होते आणि संबंधित भागात सतत मुंग्या येतात किंवा वेदना होतात.

अतिमद्यपान

अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे शरीरात थायमिन आणि इतर जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे नसा कमकुवत होतात.

किडनी किंवा लिव्हरचे विकार असल्यास शरीरातील विषारी घटक योग्य प्रकारे बाहेर पडत नाहीत, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे आणि नसांचे नुकसान होऊन मुंग्या येण्याचा त्रास बळावतो.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Maharashtra News Live Update: पंढरपूरात ऊस दराच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांचा एल्गार

Mumbai : मुंबईत कचरा टाकणाऱ्यांवर आता AI कॅमेऱ्यांची नजर! नियम मोडल्यास भरावा लागणार दंड

गोव्यावरून धावणार नवीन Vande Bharat Express, प्रवासादरम्यान निसर्गाचा मनमोहक नजारा पाहायला मिळणार; थांबे किती? वाचा वेळापत्रक

Sleep Stroke Symptoms : झोपेत असताना स्ट्रोक का येतो? 'ही' लक्षणं दिसली तर गाफील राहू नका अन्यथा...

कोरड्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशीच मृत्यूला कवटाळले

SCROLL FOR NEXT