Health warning signs saam tv
लाईफस्टाईल

Nail color change: नखांचा रंग निळा पडत असेल तर 'हे' आजार असू शकतात; लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे घ्या धाव

Health warning signs: नखं निळी पडणं हे शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेचं संकेत असू शकतं. हृदय, फुफ्फुस किंवा रक्ताशी संबंधित समस्यांमुळेही हे होऊ शकतं. ही लक्षणं वारंवार दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आपण आजारी असलो की शरीर आपल्याला काही ना काही इशारे देत असतं. पण अनेकदा असं होतं की, आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. पण नखांचा रंग बदलणं हा त्यापैकीच एक महत्त्वाचा इशारा असू शकतो. विशेषतः नखं निळसर दिसायला लागली तर ही बाब हलक्यात घेऊ नका.

हैदराबादमधील यशोदा रूग्णालयाच्या वरिष्ठ जनरल फिजिशियन डॉ. विघ्नेश यांनी सांगितलं की, नखं निळी पडण्यामागे मुख्य कारण म्हणजे शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा बोटांपर्यंत रक्तपुरवठा नीट न होणं. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला Cyanosis असं म्हणतात.

नखं निळी का पडतात?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नखांचा रंग निळा होण्यामागे अनेक कारणं असू शकतात.

थंडीमुळे होणारा परिणाम

हिवाळ्यात किंवा खूप थंड वातावरणात बोटांच्या नसांमध्ये आकुंचन येतो. त्यामुळे काही काळासाठी रक्तप्रवाह कमी होतो आणि नखं थोडी निळसर दिसू शकतात. साधारणपणे शरीर उबदार झाल्यावर ही समस्या आपोआप कमी होते. मात्र ही स्थिती वारंवार होत असेल किंवा बराच वेळ टिकत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये

हृदयाशी संबंधित समस्या

काही वेळा हार्ट अटॅक असलेल्या व्यक्तींमध्येही नखं निळी दिसू शकतात. कारण हृदय व्यवस्थित ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरात पंप करू शकत नाही. अशावेळी नखांचा रंग बदलणं हा एक महत्त्वाचा संकेत असू शकतो.

फुफ्फुसांचे आजार

अस्थमा, सीओपीडी किंवा इतर श्वसनाच्या समस्या असल्यास श्वास घेण्यास अडचण येते. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याचा परिणाम नखांच्या रंगावर दिसून येतो. ही लक्षणं दीर्घकाळ दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं.

हिमोग्लोबिन

हिमोग्लोबिन कमी असणं किंवा इतर रक्ताचे विकार असतील, तर शरीरात ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचत नाही. अशावेळी नखं निळसर दिसू शकतात.

फक्त एकच नख निळं का पडतं?

काही वेळा फक्त एकाच बोटाचं नख निळं दिसतं. अशावेळी त्यामागे साधं कारण म्हणजे दुखापत असू शकते. बोट दाबलं जाणं, घट्ट बूट घालणं किंवा नखाखाली रक्त साचणं यामुळे नख निळं किंवा काळसर दिसू शकतं.

काळजी करण्याची परिस्थिती

जर एकाच वेळी अनेक नखं किंवा संपूर्ण हात निळा पडत असेल आणि त्यासोबत चक्कर येणं, छातीत दुखणं किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ही स्थिती गंभीर असू शकते. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT