मुंबई : गर्भाशयाच्या आतील भागाला एंडोमेट्रियम असे म्हटले जाते. मासिक पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव हा योनीमार्फत बाहेर टाकला जातो.
हे देखील पहा -
एंडोमेट्रिओसिसमध्ये गर्भाशयात असणारे घटक हे अंडाशय, फॅलोपियन ट्यूब, योनी किंवा आतडे यांकडे वळलेले जातात. या स्थितीचे लवकर निदान झाल्यास त्यावर लवकर उपाचर करता येऊ शकतात. यामुळे आपल्याला मासिक पाळीदरम्यान अधिक त्रास होऊ लागतो. आपल्यापैकी बरेच लोक या वेदनेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या वेदनेची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. एंडोमेट्रिओसिस मासिक पाळीदरम्यान कसा प्रभाव पडतो ते जाणून घेऊया.
१. एंडोमेट्रिओसिस असलेल्या प्रत्येकाला याची लक्षणे जाणवत नाहीत. या लक्षणांची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलू शकते. तसेच, एंडोमेट्रिओसिसचे प्रमाण नेहमी वेदनेशी संबंधित नसते. मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव; आणि थकवा, अतिसार, बद्धकोष्ठता, गोळा येणे किंवा मळमळ ही लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. मासिक पाळी येणाऱ्या कोणत्याही स्त्रीला एंडोमेट्रिओसिस होऊ शकतो. हा आजार साधारणत: २५ ते ४० वयोगटातील स्त्रियांना होऊ शकतो. किशोर वयातील मुलींना (Child) पहिल्यादा पाळी आल्यानंतर चक्कर येणे किंवा अधिक त्रास होणे ही गोष्ट सामान्य आहे. काही स्त्रियांमध्ये हा आजार रजोनिवृत्तीनंतरही राहू शकतो.
३. या आजारामुळे बहुतेकदा वंध्यत्व देखील येते. यावर वेळीच योग्य तो उपचार केल्यास ही समस्या देखील सोडवण्यात यश येईल. याची लक्षणे ही मासिक पाळीच्या चक्रानुसार बदलू शकतात व त्याचा त्रास सुरू होऊ शकतो.
४. तसेच यामुळे मूत्राशयाच्या ठिकाणी जळजळ, वारंवार लघवीला येणे, सतत खाज लागणे, मासिक पाळी येण्यापूर्वी काही दिवासांआधी लघवीमध्ये अधून मधून रक्त येणे. हा त्रास अधिक प्रमाणात वाढल्यास यावर कोणताच उपचार करता येत नाही. त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.