Mahadevi Elephant
Mahadevi Elephantx

Mahadevi Elephant : आणू महादेवीला घरी...! हत्तीणीला परत आणण्यासाठी दोन लाखांहून अधिक कोल्हापूरकरांनी दिली स्वाक्षरी

Mahadevi Elephant News : नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनताराहून परत आणण्यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त कोल्हापूरकरांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. हे स्वाक्षरीचे अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले.
Published on
Summary
  • महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहिम

  • दोन लाखांपेक्षा जास्त कोल्हापूरकरांनी घेतला सहभाग

  • अर्ज राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत.

रणजित माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Kolhapur : कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावामधील महादेवी (माधुरी) हत्तीण वनतारामध्ये पाठवण्यात आली आहे. नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामधील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तामध्ये गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर कोल्हापुरामध्ये संतापाची लाट उसळली. लाडक्या महादेवी हत्तीणीला परत घेऊन येण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

Mahadevi Elephant
Maharashtra Politics : शिवसेनेला मोठं खिंडार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का

दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. तब्बल दोन लाख चार हजार चारशे एकवीस कोल्हापुरकरांनी महादेवीला/ माधुरीला परत आणण्यासाठीच्या फॉर्ममध्ये स्वाक्षरी दिली. आज रमणमळा पोस्ट ऑफिस येथे हे सर्व फॉर्म भारताच्या राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांना पाठवण्यात आले.

Mahadevi Elephant
Yavat Pune : यवत हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, २२ जणांना अटक

आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टेम्पोतून हे सर्व सह्यांचे फॉर्म असलेले बॉक्स पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन आलेत. यावेळी त्यांनी हे सर्व बॉक्स राष्ट्रपतींना पाठवा अशी देखील विनंती केली. जोपर्यंत महादेवी हत्तीणीला नांदणी येथे परत आणलं जात नाही तोपर्यंत विविध मार्गाने हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

Mahadevi Elephant
Prajwal Revanna : ४७ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार, माजी खासदाराला जन्मठेप; काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com