तुम्हालाही अनेकदा उचक्या लागतात. मुळात ज्यावेळी अचानक तोंडात हवा घुसून स्वर नलिकेमध्ये प्रवेश करते तेव्हा उचक्या सुरु होतात. या स्थितीमध्ये वोकल कोर्ड ज्या आपल्या गळयामध्ये असतात त्या लवकर बंद होतात आणि उचकीचा आवाज सुरु होतो. तर अशी आहे ही उचकीची सामान्य प्रकिया... उचकी आल्यावर अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही कारण उचकी ही स्वत:च आपोआप थांबते.
असं मानलं जातं की, ज्यावेळी बाळ पोटात असतं तेव्हाच त्याला उचकी सुरू होते. गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत बाळाला पोटातच उचकी येऊ लागते. बाळाला उचकी येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.
पुण्यातील अंकुरा रूग्णालयील वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद कुलट यांच्या सांगण्यांनुसार, जर बाळ खूप जास्त दूध पीत असेल आणि त्याचं पोट फुगत असेल तर हे ब्लोटिंगला कारणीभूत ठरू शकतं. यामुळे डायफ्राम(छातीच्या पिंजऱ्यातील विभाजक पडदा)वर दबाव पडतो आणि एब्डोमिनल कॅव्हिटी पसरते. यामुळे अचानक कॉन्ट्रेक्शन निर्माण होतं आणि ते उचकीचे रूप घेऊ शकते. बाटलीतून दूध प्यायल्याने सुद्धा बाळाला उचकी येण्याची शक्यता असते. कारण दुधासोबत बाळाच्या पोटात हवा सुद्धा जाते. यामुळे बाळाचे पोट वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणून उचकी येते.
ज्या बाळांना अस्थमाचा त्रास असतो त्यांना वारंवार उचकी लागू शकते. याचं कारण अशा बाळाच्या फुफ्फुसाच्या ब्रोंकाई मध्ये सूज आलेली असते. यामुळे डायफ्रामवर परिणाम होऊन उचकी येण्यास सुरुवात होते. बाळाच्या अन्न नलिकेत सूज निर्माण होते. त्याचा प्रभाव डायफ्रामवर पडतो आणि कॉन्ट्रेक्शन सुरु होऊन उचकी लागते.
जर दूध पिताना बाळाला उचकी लागली तर त्याला शांत करा. बाळाला जेव्हा खूप भूक लागलेली असते आणि तेव्हा तुम्ही त्याला दूध पाजत तेव्हा सुद्धा बाळाला उचकी येते म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवावी की बाळाला खूप भूक लागण्यापूर्वीच दूध पाजून घ्यावे. यामुळे दूध पिताना उचकी लागण्याची शक्यता फार कमी होते.
बाळाची उचकी थांबवण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे ढेकर काढणं. ज्यावेळी तुम्ही दुसरं काही खाऊ घालत असाल तेव्हा बाळाला फुंकर घालण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा बाळाला वारंवार उचकी येऊ लागते तेव्हा त्याला तुमच्या मांडीवर उलटे झोपायला लावा. याशिवाय, तुम्ही त्याला तुमच्या खांद्यावर देखील ठेवू शकता, त्याच्या पाठीवर गोलाकार हात फिरवत राहा.
ग्राइप वॉटरच्या मदतीने तुम्ही लहान मुलांची उचकी घालवू शकता. ग्राइप वॉटरमध्ये बडीशेप, लिंबू आणि आले सारख्या बऱ्याच औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे. जे सहजपणे उचकीवर मात करू शकते. याचा उपयोग केल्यास पोटात असणारी हवा सहज बाहेर काढता येते. अर्धा कप पाण्यात एक चमचा ग्राइप वॉटर टाकून मुलाला द्या.
बाळाला जेव्हा खूप भूक लागलेली असते आणि तेव्हा तुम्ही त्याला दूध पाजत तेव्हा सुद्धा बाळाला उचकी येते म्हणून हि गोष्ट लक्षात ठेवावी की बाळाला खूप भूक लागण्यापूर्वीच दूध पाजून घ्यावे. यामुळे दूध पिताना उचकी लागण्याची शक्यता फार कमी होते.
नवजात बालकांना दररोज काही मिनिटे ते तासभर उचकी लागून राहते मात्र त्यापेक्षा जास्त वेळ उचकी लागतेय आणि कमी होत नाहीये तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे. उचकी लागताना मुलांच्या छातीतून आवाज येतं असेल त्वरित डॉक्टरना दाखवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.