Panchmukhi Hanuman Saam Tv
लाईफस्टाईल

Panchmukhi Hanuman : हनुमानाने का घेतला होता पंचमुखी अवतार, जाणून घ्या सविस्तर

Hanuman Janmotsav : हनुमान आपल्या भक्तांवर आलेले कोणतेही संकट तात्काळ दूर करतात, म्हणूनच हनुमानाला संकटमोचन असेही म्हटले जाते.

कोमल दामुद्रे

Hanuman Jayanti 2023 : जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।।

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला. श्री रामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो.

हनुमान आपल्या भक्तांवर आलेले कोणतेही संकट तात्काळ दूर करतात, म्हणूनच हनुमानाला संकटमोचन असेही म्हटले जाते. तसे तर हनुमान हे स्वतः भगवान श्री रामाचे निस्सीम भक्त आहेत आणि त्यांचे नाव नेहमी स्मरणात ठेवतात, परंतु एकदा जेव्हा भगवान श्री राम (Ram) देखील संकटात सापडले होते तेव्हा हनुमानजींनी पंचमुखी अवतार घेतला आणि त्यांना संकटातून वाचवले. हनुमानजींच्या पाच मुखी अवतारांबद्दल जाणून घेऊया.

तीन मुखं असलेले दत्त आणि दहा मुखं असलेला रावण यासारखी दैवतं आपल्याला हिंदू संस्कृतीत पाहायला मिळतात. भक्तांना त्यांचं दैवत मूर्त स्वरूपातच दिसावं, हे त्याचं कारण असतं. पंचमुखी हनुमान हे यातलंच एक दैवत.

1. हनुमानाचा पंचमुखी अवतार

रामायणाच्या संदर्भानुसार, लंका युद्धाच्या वेळी, जेव्हा रावणाचा भाऊ अहिरावण याने आपल्या जादूच्या सामर्थ्याने राम आणि लक्ष्मण यांना मोहित करून पाताळ लोकात नेले होते. जिथे अहिरावणाने पाच दिशांना पाच दिवे लावले होते. त्याला वरदान होते की जोपर्यंत हे पाच दिवे एकत्र विझवत नाहीत तोपर्यंत अहिरावणाला मारले जाणार नाही. अहिरवाणाचा हा भ्रम संपवण्यासाठी हनुमानाने पंचमुखी हनुमानाचा अवतार पाच दिशांना धारण करून पाचही दिवे एकत्र विझवून अहिरवाणाचा वध केला. त्यामुळे भगवान राम आणि लक्ष्मण त्यांच्या बंधनातून मुक्त झाले.

पंचमुखी हनुमान हे एक दैवत आहे. घारापुरीचा पंचमुखी शिव त्रिमूर्ती रूपात आकारावा लागला. कन्हेरीचा अकरामुखी अवलोकितेश्वर एकावर एक मुंडकी रचून दाखवावा लागला. त्यात कलात्मकता संपली. रावणाची दहा तोंडं शिल्पात सोडा, पण चित्रातही नीट बसत नाहीत, पण भक्तांना त्यांचं दैवत मूर्त स्वरूपातच दिसावं लागतं. कलेशी त्यांचं देणं-घेणं नसतं. म्हणून निरनिराळय़ा पुराणांतून आढळणा-या उल्लेखांचा मेळ आणि घोळ घालून पंचमुखी हनुमान चितारला गेला.

2. पंचमुखी हनुमानाच्या पाच मुखांचे महत्त्व

1. सात्त्विकता, पावित्र्यता, यश (Success), भक्ती, औदार्य, त्याग आणि बलाचा संदेश देणारं मुख्य हनुमान मुख !

2. निर्भयपणा आणि संकटाशी सामना संदेश देणारं प्रबळ शक्ती देणारं नरसिंह मुख !

3. जादूटोणा, मंत्र (Mantra)तंत्र, पिशाच्च व विविध बाधांपासून हरण करणारं आणि त्यापासून सतत रक्षण करून आवरण कवच निर्माण करणारं गरुड मुख !

4. सर्व क्षेत्रात प्रगती, संपत्ती, यश, धन, समृद्धी, ऐषाराम देणारं वराहमुख !

5. अवकाशापासून येणा-या सर्व दुष्ट शक्तींना रोखून चांगल्या शक्तींना थारा देणारे हयग्रीवाचं मुख !

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT