Dahi Handi 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Dahi Handi 2023 : गोविंदा रे गोपाळा..., जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीचं दहीहंडी का साजरी केली जाते?

Janmashtami 2023 : श्रावण महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमीला जन्माष्टमी साजरी केली जाते.

कोमल दामुद्रे

Dahihandi Date 2023:

श्रावण महिन्यातील सगळ्यांचा आवडता सण दहीहंडी. श्रावण महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अष्टमीला जन्माष्टमी साजरी केली जाते. यावर्षी हा उत्साह ६ आणि ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे.

दहीहंडी हा सण अगदी थाटामाटात भारतभर साजरा केला जातो. हा सण लहान मुलांच्या करमणुकीचा एक भाग मानला जातो. परंतु, सध्या प्रत्येक भागात मोठं मोठ्या पद्धतीने दहीहंडीचे थर गोविंदा पथक लावतात आणि प्रथम येणाऱ्या पथकाला पैसे देखील दिले जातात.

1. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा सण का साजरा केला जातो?

दहीहंडी हा सण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या (Janmashtami) जयंती दिनी साजरा केला जातो. हा सण मोठ्या उत्साहात मथुरेत आणि द्वारकानगरीत साजरा करण्यात येतो. या उत्साहात बाळगोपाळ लहानपणी शेजाऱ्यांच्या घरचे दही (Curd), दूध आणि लोणी चोरून खात होते, असे म्हटले जाते. दहीहंडीच्या दिवशी मडके फोडण्याची प्रथा आहे. दहीहंडी फोडणाऱ्या लहान मुलाला बाळगोपाळाच्या रुपात समजले जाते. ज्याद्वारे श्रीकृष्णाची पूजा केली जाते. दहीहंडीच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या बाल लीलाचे रुप पुन्हा पाहावयास मिळते.

2. यंदा दहीहंडी कधी आहे?

श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमीला दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जाईल. श्रीकृष्णाचा जन्म रात्री मध्यंतरी झाला आहे. यंदा हा सण ६ आणि ७ सप्टेंबरला या दोन्ही दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या सण प्रामुख्याने जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा (Celebrate) केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर दगडफेक

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गमध्ये लपलेला 'हा' समुद्रकिनारा पाहताच मालदीव,थायलंड विसराल

Dombivli : डोंबिवलीत मोठा राडा! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, कारही फोडली; Video

जीवनात शांतता हवीये? पत्नीला चुकूनही बोलू नका 'या' 5 गोष्टी, नाहीतर...

Elections : निवडणुका येताच भाजपनं टाकला पहिला डाव; मुख्यमंत्र्यांचा प्लान ठरला, VIDEO

SCROLL FOR NEXT