Heart Attack alert  Saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Heart Attack alert : तुम्ही हार्ट पेशंट आहात? मग ही बातमी जरुर पाहा....कारण हार्ट अटॅक येण्याची विशिष्ट वेळ असते. हार्ट अटॅक नेमका कोणत्या दिवशी येतो? यावरचं संशोधन समोर आलंय. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट

Suprim Maskar

हृदय ठणठणीत राहावं यासाठी अनेकजण काळजी घेतात. अगदी व्यायामापासून आहारापर्यंत सजग राहतात. तर काही जण हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर शहाणं होऊन पथ्यपाणी पाळतात. मात्र हार्ट अटॅक येण्याचा आणि दिवसाचा काही संबंध असतो का? आठवड्याच्या विशिष्ट दिवसात हार्ट अटॅक येऊ शकतो का? हे प्रश्न ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं... मात्र या प्रश्नांची उत्तर एका संशोधनातून समोर आली आहेत..

सोमवारी हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण अधिक असल्याचा दावा बेलफास्ट आणि आयर्लंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या एका संशोधनात करण्यात आलाय.. यात 13 टक्के लोकांना हार्ट अटॅक सोमवारी येतात. आठवड्याच्या शेवटी विश्रांती घेतल्यानंतर, अचानक आलेला कामाचा ताण, टार्गेट पूर्ण करण्याची काळजी यामुळे हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ होते.

तसचं भारतात हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका 33 टक्क्याने वाढतो. त्याशिवाय पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. या कालावधीत उच्च रक्तदाब, कमी शारिरीक हालचाली आणि पाण्याची कमतरता यामुळे हार्ट अटॅक येत असल्याचं संशोधनात सांगण्यात आलयं...

दरम्यान जगभरात हदयरोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. भारतात हार्ट अटॅकमुळे किती मृत्यू झालेत ते पाहूयात

जगभरात दरवर्षी सुमारे 90 लाख लोकांचा हृदयविकाराने मृत्यू होतो. भारतात सुमारे एक चतुर्थांश लोकांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतो. देशात 2021 मध्ये 28,413 जणांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला. तर 2022 मध्ये तब्बल 32,457 जणांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झालाय.

बदलती धावती जीवनशैली, जंकफुडचं सेवन, व्यायामाची कमतरता यामुळे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना हदयरोगांच्या समस्यांना समोरे जावे लागतेय. या नव्या संशोधनातून हार्ट अटॅक रोखण्यासाठी रुग्णांना योग्य वेळी उपचार घेण्यास मदत होईल. दुसरीकडे सोमवारी ऑफिसात जाण्यापूर्वी तुमचं हृदय काळजीने धडधडत असेल...तर शांत राहून तणावाचे व्यवस्थापन करा...मग आत्मविश्वासाने, आनंदाने आठवड्याची सुरुवात करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाहाची जगभरात क्रेझ; किंग खानला मिळाला हा मोठा किताब

Pune: दारू पिऊन भररस्त्यात धिंगाणा, कोर्टाकडून आरोपींना अजब शिक्षा; तुरुंगात न पाठवता थेट...

Christmas Tourism: ख्रिसमसला 2 दिवसाची ट्रीप करा प्लान, भारतातल्या 'या' Top 7 ठिकाणांची नावे पाहाच

Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील ३ दिवस 'या' भागात राहणार पाणी बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Narendra Modi Successor : कोण होणार PM नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी? RSS प्रमुख मोहन भागवत यांनी दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT